मुख्यमंत्री स्टॅलिन यांनाच मतदारांनी घरे बसविले ! व्ही. एस. बाबू यांना ‘विजय’ कसा पावला ?

TamilNadu Election-स्टॅलिन यांनी 1989 ते 2011 या काळात चार वेळा थाउजंड लाइट्स मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. 2011 मध्ये त्यांनी कोलाथूर मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि पुढे तीन वेळा ते निवडून आले.

Tamilnadu Election

Tamilnadu Election

MK Stalin loses to TVK candidate in Kolathur constituency : तामिळनाडू विधानसभेचा निकाल धक्कादायक लागला आहे. यंदा तामिळनाडूच्या मतदारांनी (TamilNadu Election) एक समीकरण तोडलं आहे. हे समीकरण होतं डीएमके आणि एआयडीएमकेला आलटून पालटून सत्ता देणं. या दोन पक्षांच्या भोवती येथील राजकारण फिरत होतं. पण अभिनेते विजय यांच्या टीव्हीके पक्षाने डीएमकेची सत्ता उलथून तरच लावलीच. पण विद्यमान मुख्यमंत्री एम. के स्टॅलिन (MK Stalin) यांचा पराभव केला. टीव्हीकेचे (TVK) उमेदवार व्ही. एस. बाबू (V S Babu) यांनी हा मोठा करिश्मा केलाय. मुख्यमंत्र्यांना पराभूत करणारे व्ही. एस. बाबू कोण आहेत. तामिळनाडूच्या राजकारणाच्या इतिहासात आणखी काही दिग्गज नेते असेच पराभूत झाले होते का हेच पाहुया

कोलाथूर मतदारसंघात डीएमके नेते ए. के. स्टॅलिन यांचा तामिळगा वेट्री कळघम (टीव्हीके) पक्षाचे व्ही. एस. बाबू यांनी मोठा पराभव केलाय. विशेष म्हणजे एआयएडीएमके उमेदवार रिंगणात होता. त्यानंतर बाबू यांना स्टॉलिन यांचा पराभव केला. व्ही. एस. बाबू यांना 88 हजार 180 मते मिळाली. तर स्टॅलिन यांना 72 हजार 988 मते मिळालीत. या पराभवामुळे तब्बल वीस वर्षानंतर एम. के. स्टॅलिन हे विधानसभेत दिसणार नाहीत. ते नऊ वेळा आमदार राहिलेले आहेत.

स्टॅलिन यांनी 1989 ते 2011 या काळात चार वेळा थाउजंड लाइट्स मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. 2011 मध्ये त्यांनी कोलाथूर मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि पुढे तीन वेळा ते निवडून आले. परंतु यंदा त्यांचा पराभव झाला. त्यांना पराभव करणारे व्ही. एस. बाबू हे डीएमकेचे एकेकाळचे नेते आहेत. ते डीएमकेकडून 2006 ते 2011 या काळात पुरुषलवाकम मतदारसंघाचे आमदार होते. त्यांनी एआयएडीएमकेमध्ये प्रवेश केला होता, पण या पक्षाकडून त्यांनी कोणतेही निवडणूक लढवली नाही. या वर्षीच फेब्रुवारीमध्ये त्यांनी विजय यांच्या टीव्हीके पक्षात प्रवेश केला होता. परंतु ते वजनदार नेते मानले जात नव्हते. तरीही त्यांनी मुख्यमंत्र्यांचा पराभव केला आहे. स्टॉलिन यांनी अनेक लोकप्रिय योजनांची घोषणा केली होती. त्यानंतर मतदारांनी त्यांना नाकारले आहे.

तामिळनाडूमध्ये यापूर्वीही अनेकांना धक्के
तामिळनाडूमध्ये इतर विद्यमान मुख्यमंत्र्यांनीही निवडणुका गमवाव्या लागल्या आहेत. 1952 मध्ये श्रीविल्लिपुथूरमध्ये काँग्रेसचे मुख्यमंत्री पी. एस. कुमारस्वामी राजा यांचा धक्कादायक पराभव झाला होता. अपक्ष उमेदवार राजू यांनी हा धक्का दिला होता. तर 1967 मध्ये काँग्रेसचे तत्कालीन मुख्यमंत्री भक्तवत्सलम एम यांचा डीएमकेचे उमेदवार डी. राजारत्नम यांनी पराभव केला होता. तर 1996 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री जयललिता यांचा डीएमकेचे ई. जी. सुगवनम यांनी पराभव केला होता.

Exit mobile version