हवेतून, रस्त्यावर, बोटीतूनही धोकाच, चाललंय तरी काय? आदित्य ठाकरे कडाडले…

ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी देशात होत असलेल्या विमान अपघातांवरुन सरकारला चांगलंच धारेवर धरलंय.

Aaditya Thackeray (1)

Aaditya Thackeray (1)

Aaditya Thackeray : हवेतून जायचं असेल तर तिथून धोका, रस्त्यावरुन जायचं असेल तर खड्ड्यांमुळे धोका, बोटीतूनही धोकाच, सरकारचं चाललंय काय? या शब्दांत ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी संताप व्यक्त केलायं. दरम्यान, दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर डीजीसीएच्या विमानांच्या उड्डाणांवर बंदी घालण्यात आलीयं. त्यावर बोलताना आदित्य ठाकरे यांनी संताप व्यक्त केलायं.

बायको नांदेना…कंटाळलेल्या जावयाने केला सासऱ्याचा खून…पोलिसांनी उलगडले खुनाचे रहस्य

पुढे बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, डीजीसीएबाबत बोलायचं झालं तर, सरकारने उड्डाणस्किममध्ये भारतात अनेक विमानतळे तयार केली, पण अनेक बंदही केले आहेत. हा पैसा कोणासाठी आणि कशासाठी खर्च केला होता? कालच अंदमानला एक हेलिकॉप्टर पडलं, या दुर्देवी घटनेमध्ये सात जणांचा मृत्यू झाला. या अपघातावेळी हेलिकॉप्टरमध्ये ब्लॅकबॉक्सही नव्हता. दुसरं स्पाईसजेट बोलावून त्यांनी तिथं जावं लागलंय. हवेतून जायचं तिथून धोका, रस्त्यावरुन जायचं तिथं धोका, बोटीतूनही धोका आहे, कालच सरकारने नागरिकांसाठी काम करण्याचा ठराव पास केलायं तर मग मागील 12 वर्षांपासून कोणासाठी काम करीत होते? असा थेट सवाल आदित्य ठाकरे यांनी केलायं.

तसेच राज्यसभा निवडणुकीबाबत चर्चा कुठेही होत नाही. आत्ता आम्ही मविआ म्हणून लढत देत आहोत. कॉंग्रेस आणि आम्ही स्पष्टपणे लढत देत आहोत. मविआचे तथ्य पाहिले तर अधिक सीट आमच्या आहेत. आम्ही कॉंग्रेसबरोबर आम्ही ठामपणे लढत असल्याचंही आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.

IND vs ZIM : भारताला मोठा धक्का, झिम्बाब्वेविरुद्ध खेळणार नाही ‘हा’ स्टार खेळाडू; जाणून घ्या कारण

दरम्यान, दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताप्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी आक्रमक पवित्रा घेतल्याचं समोर आलंय. मुंबईतील मरीन ड्राईव्ह पोलिस ठाण्यात रोहित पवार आक्रमक झाल्याचे दिसून आले आहेत. विमान अपघाताप्रकरणी तक्रार देण्यासाठी गेलेल्या रोहित पवारांची तक्रार घेण्यास पोलिसांनी टाळाटाळ केलीयं. पवार यांची तक्रार घेत असतानाच एका बड्या अधिकाऱ्याने तक्रार घेण्याच नकार दिलायं, या बड्या अधिकाऱ्याला कोणाचा फोन आला होता? असा थेट सवाल आमदार पवार यांनी माध्यमांशी बोलताना केलायं.

Exit mobile version