Download App

‘…त्यांना जेलमध्ये टाकल्याशिवाय राहणार नाही’; आदित्य ठाकरेंचा रोख कुणाकडे?

नोव्हेंबरनंतर आमचे सरकार सत्तेवर येणार असून खोके सरकारची सगळी कंत्राट रद्द करणार आणि मुंबईची लूट करणाऱ्यांना जेलमध्ये टाकणार - आदित्य ठाकरे

  • Written By: Last Updated:

Aditya Thackeray : आगामी विधानसभा निवडणुकांच्या (Vidhansabha Election) पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. आता ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरेंनी (Aditya Thackeray) मुंबईतील रस्त्यांच्या कामांवरून आणि रस्त्यांवरील खड्ड्यांवरून महायुती सरकावर जोरदार हल्लाबोल केला. तसेच नोव्हेंबरनंतर आमचे सरकार सत्तेवर येणार असून खोके सरकारची सगळी कंत्राट आम्ही रद्द करणार आणि मुंबईची लूट करणाऱ्यांना जेलमध्ये टाकणार, असा इशारा दिला.

फडणीस आहेत म्हणून व्यंगचित्रकार झाले, फडणवीस असते तर व्यंगचित्र झाले असते; राज ठाकरेंचा टोला 

आदित्य ठाकरेंनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलतांना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. ते म्हणाले, गेल्या 10 वर्षांपासून एमएसआरडीसीचे खाते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे. समृद्धी महामार्गावर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. अपघाताच्या घटना वाढत आहेत. मुंबईतील वांद्रे-वर्सोवा सी-लिंकचं काम महापालिकेने हातात घेतलं तेव्हा वरचा भाग एमएसआरडीसीच्या खात्याकडे गेला. आता 2017 ते आजतागायत किती वर्षे झाली? किती खर्च झाला? किती वेळा त्यासाठी कंत्राट देण्यात आलं? गेल्या दोन वर्षांपासून महाराष्ट्रात लाडका कंत्राटदार योजना सुरू आहे. महाराष्ट्राची लूट सुरू आहे. पण मी तुम्हाला शब्द देतो की – आमचे सरकार सत्तेवर आल्यानंतर या सर्व भ्रष्ट ठेकेदार, अधिकारी किंवा कोणी मंत्री असतील त्यांना जेलमध्ये टाकल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा आदित्य ठाकरे यांनी दिला.

शरद पवारांसोबत पार्टनरशीप करुन देतो : ऑफर ऐकताच कॉन्स्टेबलने सगळं विकलं अन् 93 लाखांची फसवणूक 

एकीकडे मुंबईची लूट सुरू आहे, तर दुसरीकडे महाराष्ट्र लुटला जात आहे. आमचे सरकार नोव्हेंबरमध्ये येणार आहे. आमचं सरकार आल्यानंतर आम्ही मुंबई महापालिकेतील सर्व कामांची चौकशी करणार आहोत. त्यामध्ये मागचे महापालिका आयुक्त, महायुती सरकारमधील मंत्र्याची चौकशी करून त्यांना जेलमध्ये टाकल्याशिवाय राहणार नाही. , असे आदित्य ठाकरे म्हणाले.

पुढं बोलतांना ते म्हणाले, मध्यंतरी आणखी एक विषय आला होता. तो विषय होता भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचा. आम्ही एका फोटोवर आक्षेप घेतला होता. त्यामध्ये ठेकेदार कुठेही दिसत नव्हते. मात्र पोलीस रस्त्यावरील खड्डे बुजवत होते, याचाच अर्थ कंत्राटदारांची मज्जा सुरू आहे. मुंबई-गोवा महामार्ग असेल किंवा मुंबई नाशिक महामार्ग असेल किंवा मुंबई अहमदाबाद महामार्ग असेल,हे तिन्ही महामार्ग केंद्र सरकारच्या अखत्यारीत येतात. मी नितीन गडकरींना विनंती करणार आहे की, एकदा या तीन महामार्गांवर तुम्ही गाडीने प्रवास करा. किती खड्डे या रस्त्यावर पडले हे पाहायला मिळतील, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

follow us