Aaditya Thackeray : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद (Maharashtra-Karnataka border dispute) दिवसेंदिवस उग्र होत असून आता कर्नाटकच्या कॉंग्रेस आमदाराने थेट मुंबईला लक्ष्य केलं. आमदार लक्ष्मण सवदींनी (MLA Laxman Savadi) मुंबईला केंद्रशासित प्रदेश करण्याचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवावा, अशी मागणी अधिवेशनात केली. त्यांच्या या मागणीमुळं ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) कडाडले. त्यांनी त्यांनी थेट काँग्रेसला इशारा दिला आहे.
Shankar Mandekar : संग्राम थोपटेंची सत्ता कशी उलथून टाकली? मांडेकरांनी सगळंच सांगितलं..
मुंबई आम्हाला कोणी आंदन दिलेली नाही
आदित्य ठाकरेंनी एक्सवर एक पोस्ट केली. त्यात त्यांनी कॉंग्रेससह भाजपवर टीका केली. त्यांनी लिहिलं की, मुंबई केंद्रशासित करण्याची मागणी निक्षेधार्ह आहे. काँग्रेस असो वा भाजप… कोणताही पक्ष असो… मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याची भाषा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) अजिबात खपवून घेणार नाही. मुंबई ही आमची मायभूमी आहे. इथला प्रत्येक कण मराठी माणसानं आपलं रक्त सांडून मिळवला आहे. मुंबई आम्हाला कोणी आंदन दिलेली नाही. काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी आपल्या आमदारांना समज द्यावी, असा इशारा आदित्य ठाकरे यांनी काँग्रेसला दिला आहे.
मुंबई केंद्रशसित करण्याची मागणी निषेधार्ह आहे.
काँग्रेस असो वा भाजप… कोणताही पक्ष असो… मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याची भाषा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) अजिबात खपवून घेणार नाही.
मुंबई ही आमची मायभूमी आहे. इथला प्रत्येक कण मराठी माणसानं आपलं रक्त सांडून मिळवला आहे.…— Aaditya Thackeray (@AUThackeray) December 19, 2024
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील सीमावाद चांगलाच तापला आहे. कर्नाटक सरकारने महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यक्रमाला परवानगी नाकारल्याने सीमावाद आणखी तीव्र झाला. त्यामुळे महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नाचा केंद्रबिंदू असलेल्या बेळगावला केंद्रशासित प्रदेश घोषित करावे, असं आदित्य ठाकरे म्हणाले होते. याला प्रत्युत्तर देताना लक्ष्मण सवदी यांनी आज कर्नाटक विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात
केंद्राने बेळगावऐवजी महाराष्ट्राची राजधानी मुंबईला केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित करण्याची मागणी केली.
नेमकं सवदी काय म्हणाले?
सवदी म्हणाले, महाराष्ट्रातील बुद्धिभ्रष्ट झालेल्या एका नेत्याने बेळगावसह सीमाभाग केंद्रशासित करावा, अस वक्तव्य केलं. याबाबत माध्यमांनी आम्हाला प्रश्न विचारले. त्यावेळी संबंधित नेत्यांची मती भ्रष्ट झाल्याचं मी स्पष्टपणे सांगितले होते. कर्नाटकचा अविभाज्य अंग असलेला बेळगाव सीमाभाग केद्रशासित करायचा असेल तर मुंबई देखील केंद्रशासित करावी, अशी आम्ही मागणी केली पाहिजे.
ते पुढे म्हणाले, आमचे पूर्वज मुंबईत राहत होते. त्यामुळे मुंबईवर आमचाही हक्क आहे, असे आम्ही म्हणू शकतो. कारण पूर्वी बेळगावसह अन्य सहा जिल्हे मुंबई प्रांताचा भाग असताना आमचे कर्नाटकातील लोक मुंबईला जात असत. तिथे राहत होते. त्यामुळे मुंबईवर आमचाही हक्क आहे. त्यामुळे सर्वप्रथम मुंबई केंद्रशासित केली जावी आणि तसा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवावा, असं सवदी म्हणाले.