‘स्थगिती देऊन चालणार नाही, कारवाईचा आदेश रद्द करा; महाआरती केल्यानंतर आदित्य ठाकरेंची मागणी
Aditya Thackeray Dadar Hanuman Mandir : रेल्वेने दादर परिसरातील हनुमान मंदिराला (Dadar Hanuman Mandir) बेकायदा ठरवून पाडण्यासाठी नोटीस पाठवली होती. मात्र, ठाकरे गटाने याविरुध्द आवाज उचलल्यानंतर अखेर या निर्णयाला स्थिगिती देण्यात आली. त्यानंतर आता ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या हस्ते दादरच्या हनुमान मंदिरात महाआरती करण्यात आली.
… तर आज मी अभिनेत्री नसते, ‘बंदिश बँडिट्स’ फेम श्रेया चौधरीने केला खुलासा
मंदिरावरील कारवाईला केवळ स्थगिती देऊन चालणार नाही, तर ही कारवाईचा आदेश रद्द करण्यात यावी, अशी मागणी आदित्य ठाकरेंनी केला.
दादर रेल्वे स्थानकाजवळील ८० वर्षे जुनं हनुमान मंदिर पाडण्यासाठी रेल्वे प्रशासनाने काढलेल्या आदेशाच्या निषेधार्थ आज हनुमान मंदिरासमोर आंदोलन करण्यात आले.
तसेच श्री हनुमंतांची आरती करून कृपाशीर्वाद घेतले. pic.twitter.com/roveJYVkjQ— Aaditya Thackeray (@AUThackeray) December 14, 2024
हनुमान मंदिर पाडण्याची नोटीस रेल्वे प्रशासनाकडून बजावण्यात आल्यानंतर उद्धव ठाकरेंनी भाजपवर टीका जोरदार हल्लाबोल केला होता. एक है तो सेफ है म्हणतात पण, मंदिरही सेफ नाहीत अशी टीका त्यांनी केली. तापलेलं वातावरण पाहून रेल्वे विभागाने या कारवाई स्थगिती दिली. दरम्यान, आता आदित्य ठाकरे यांनी दादर येथील हनुमान मंदिरात महाआरती केली. यावेळी त्यांच्यासोबत खासदार संजय राऊत, खासदार अनिल देसाई, सचिन अहिर यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी मंदिरावरील कारवाईला केवळ स्थगिती देऊन चालणार नाही, तर ही कारवाईचा आदेश रद्द करण्यात यावी, अशी मागणी केली.
काँग्रेसच्या माथ्यावरील पाप कधीच धुतलं जाणार नाही; लोकसभेतून PM मोदींचा जोरदार ‘प्रहार’
तत्पूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत आदित्य ठाकरे यांनी मंदिरच्या मुद्द्यावरून भाजपवर जोरदार निशाणा साधला होता. भाजपचे हिंदुत्व फक्त निवडणुकीपुरते आहे, उद्धव ठाकरे यांनी भाजपचे निवडणुकीपुरतीचे हिंदुत्व अनेकदा उघड केले आहे. भाजपशासित राज्यांमध्येच हिंदुत्व धोक्यात आहे. मंदिर पाडण्याची नोटीसही त्यांच्या सरकारची आहे आणि मंदिर पाडण्याच्या निर्णयाला स्थगिती देण्याचा निर्णयही त्यांच्याच सरकारचा आहे, असं म्हणत आदित्य यांनी सरकारवर निशाणा साधला.
आदित्य ठाकरेंनी मंदिरात जाऊन आरती करण्याआधीच भाजप नेते किरीट सोमय्या दर्शनासाठी आले होते. त्यावेळी मंदिर परिसरात मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते. सोमय्या यांना पाहताच ठाकरेंचे शिवसैनिक आक्रमक झाले आणि त्यांनी सोमय्यांविरोधात घोषणाबाजी सुरू केली. त्यावेळी भाजप आणि सेना कार्यकर्ते आमनेसामने आल्याने गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप केला.
दरम्यान, दादर पूर्वेला प्लॅटफॉर्म क्रमांक 12 च्या बाहेरील हनुमान मंदिर अनधिकृत असल्याचा दावा रेल्वे प्रशासनने केला. याशिवाय या मंदिराच्या विश्वस्तांना नोटीस देण्यात आली आहे की, 7 दिवसांच्या आत मंदिराच्या विश्वस्तांनी ते स्वतः पाडावे, अन्यथा रेल्वे ते पाडेल. त्यानंतर आता सदर नोटीसच्या अंमलबजावणीला स्थगिती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.