काँग्रेसच्या माथ्यावरील पाप कधीच धुतलं जाणार नाही; लोकसभेतून PM मोदींचा जोरदार ‘प्रहार’

  • Written By: Published:
काँग्रेसच्या माथ्यावरील पाप कधीच धुतलं जाणार नाही; लोकसभेतून PM मोदींचा जोरदार ‘प्रहार’

PM Modi On Congress : काँग्रेस परिवाराने संविधान दुखावण्याची कोणतीही कसर सोडली नाही. अशी टीका आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी लोकसभेत काँग्रेसवर (Congress) केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभेत संविधानावरील झालेल्या चर्चेला उत्तर देत होते. यावेळी त्यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली.

या चर्चेला उत्तर देत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, संविधानाबद्दल मला विशेष आदर व्यक्त करायचा आहे. माझ्यासारखे अनेक लोक आहेत जे इथपर्यंत पोहोचू शकले नसते, पण संविधानामुळेच आम्ही इथपर्यंत पोहोचलो असून, ही संविधानाची ताकद आणि जनतेचा आशीर्वाद होता.

तर दुसरीकडे काँग्रेस परिवाराने संविधान दुखावण्याची कोणतीही कसर सोडली नाही. काँग्रेसच्या एका घराण्याने संविधान दुखावण्याची कोणतीही कसर सोडली नाही. मी या कुटुंबाचा उल्लेख करतो कारण याच कुटुंबाने या देशावर 55 वर्षे राज्य केले आहे. त्यामुळे देशाला हे जाणून घेण्याचा अधिकार आहे. या घराण्याचे कुकर्म, दुष्ट विचार सतत सुरू आहेत. 1947 ते 1952 पर्यंत तात्पुरती व्यवस्था होती. निवडणुका झाल्या नाहीत. 1952 पूर्वी राज्यसभेची स्थापनाही झाली नव्हती. असे असतानाही 1951 मध्ये निवडून आलेले सरकार नसताना त्यांनी विधेयक आणून राज्यघटना बदलली. मग अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला झाला. हा संविधान निर्मात्यांचा अपमान होता. अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लोकसभेत बोलताना काँग्रेसवर केली.

तर माजी पंतप्रधान नेहरूंच्या पत्राचा संदर्भ देत पीएम मोदी म्हणाले की, हे पाप 1951 मध्ये झाले होते. त्यावेळी राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी नेहरूजींना सावध केले होते की ते चुकीचे करत आहेत, परंतु पंडितजींचे पालन करण्यासाठी स्वतःचे संविधान होते, त्यामुळे त्यांनी कोणाचाही सल्ला ऐकला नाही. काँग्रेसला घटना दुरुस्तीचे इतके वेड लागले होते की ते वेळोवेळी राज्यघटनेची शिकार करत राहिले. राज्यघटना अनेक वेळा बदलण्यात आली. देशाच्या पहिल्या पंतप्रधानांनी जे पेरले, त्याला खत-पाणी दुसऱ्या पंतप्रधानांनी दिले, ज्यांचे नाव होते इंदिरा गांधी. असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

पुढे बोलताना नरेंद्र मोदी म्हणाले की, काँग्रेसच्या राजवटीत लोकशाहीचा गळा घोटला गेला. आणीबाणीच्या काळात देशाला तुरुंगगृह बनवण्यात आले. जेव्हा आपण संविधानाची 75 वर्षे साजरी करत आहोत, तेव्हा एक आदिवासी महिला भारताच्या राष्ट्रपतीपदावर आहे, हा एक चांगला योगायोग आहे. एवढेच नाही तर आपल्या सभागृहात महिला खासदारांची संख्याही सातत्याने वाढत आहे.आम्ही वन नेशन वन रेशन कार्डबद्दल बोललो.

संसदेत सावरकर, हिंदुत्व अन् राहुल गांधी, महाराष्ट्रात MVA मध्ये फुटीची स्क्रिप्ट रेडी ?

देशातील गरिबांना मोफत उपचार मिळाले आणि देशातील सर्वसामान्य नागरिकांना गरिबीशी लढण्याचे बळ मिळाले. आम्ही वन नेशन वन आयुष्मान कार्ड आणले.असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube