Ashish Shelar : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे(Chandrashekhar Bawankule) यांचा मकाऊमधला कसिनो खेळतानाचा कथिक फोटो खासदार संजय राऊतांनी (Sanjay Raut) पोस्ट केला होता. या फोटोवरुन राजकीय वर्तुळात विरोधकांकडून बावनकुळेंवर जोरदार टीका करण्यात आली. भाजप नेते बावनकुळे यांच्या बचावात उतरले आहेत. देवेंद्र फडणवीस, प्रविण दरेकर यांच्यानंतर आता आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी संजय राऊतांवर जोरदार हल्लाबोल केला.
एलॉन मस्क यांना विनंती करणार आहे की महाराष्ट्रातील त्यात प्रभादेवी येथे बसणाऱ्यांनी पहिल्यांदा गांजाचं सेवन केलं नाही, याचं प्रमाणपत्र ट्विट करावं. मगच, भाष्य करावे. दिवसाढवळ्या गांजा ओढणारे दुसऱ्यांवर आरोप करत आहेत. कोण संजय राऊत. कधी जनतेतून उभे राहिले आहेत का. याच राऊतांनी गोरेगावमधील मराठी माणसांची घरे खाल्ली आहेत. संजय राऊतांकडे 27 फोटो असतील तर आमच्याकडे 270 आहेत. मग पेग-पेंग्विन पार्टीचे चालक आणि मालक समोर आणावे लागतील, असा इशारा शेलार यांनी दिला.
माझ्याकडं 27 फोटो अन् 5 पाच व्हिडिओ, भाजपचं दुकानच बंद पडेल; संजय राऊत कडाडले
राऊतांनी जाणीवपूर्वक अर्धवट फोटो टाकले – फडणवीस
संजय राऊत यांची विकृत मानसिकता त्यातून दिसत आहे. ते किती उताविळ झालेत हेही त्यातून दिसतं. चंद्रशेखर बावनकुळे त्यांच्या संपूर्ण कुटुंबासह त्या हॉटेलला थांबले होते. त्यांनी जेथे जेवण केलं ते रेस्टॉरंट आणि बाजूचं केसिनो हे एकत्र होतं. संजय राऊतांनी जाणीवपूर्वक अर्धवट फोटो पोस्ट केला आहे. पूर्ण फोटोत हे स्पष्टपणे लक्षात येतं की, तेथे बावनकुळे, त्यांच्या पत्नी, त्यांची मुलगी, नातू असं सगळं कुटुंब आहे. त्यामुळे ही विकृत मानसिकता कुठेतरी संपवली पाहिजे. इतकी निराशा योग्य नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते.
काय म्हणाले होते राऊत?
19 नोव्हेंबर मध्यरात्री मुक्काम पोस्ट मकाऊ,veneshine. साधारण 3.50 कोटी कॅसिनो जुगारात उडवले असे प्रत्यक्ष दर्शी सांगतात. हिंदुत्ववादी असल्याने महाशय द्युत खेळले तर बिघडले कोठे? ते तेच आहेत ना? ते म्हणतात फॅमिलीसह मकाऊला गेले आहेत. त्यांच्या सोबत बसलेली फॅमिली चिनी आहे का? ते म्हणतात कधीच जुगार खेळले नाहीत. मग ते नक्की काय करत आहेत? त्यांच्या टेबलावर मारुती स्तोत्र आहे का? जेवढे खुलासे कराल तेवढे फसाल, झाला तेवढा तमाशा पुरेसा असं ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
बावनकुळेंना जाणीवपूर्वक बदनाम करण्याचा प्रयत्न; विरोधकांच्या टीकेनंतर दरेकर सरसावले