Download App

महायुतीत जुंपली! मंत्री अतुल सावे रडारवर; आमदार कोहळीकरांचा आंदोलनाचा इशारा

निधीवाटपाच्या मुद्द्यावरुन महायुतीच्या नेत्यांमध्ये जुंपली असून मंत्री अतुल सावे यांच्याविरोधात मंत्री मेघना बोर्डिकर आणि आमदार बाबुराव कोहलीकरांनी आक्रमक पवित्रा घेतलायं.

Nanded News : विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात महायुतीची सत्ता स्थापन झाली. महायुतीमधील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपच्या आमदारांमध्ये मंत्रिपदाचंही वाटप झालं. त्यानंतर आता महायुतीच्या नेत्यांमध्ये निधीच्या मुद्द्यावरुन जुंपलीयं. ओबीसी कल्याण मंत्री अतुल सावे (Atul Save) यांच्याविरोधात राज्यमंत्री मेघना बोर्डिकर (Meghna Bordikar) आणि शिवसेना आमदार बाबुराव कोहळीकर (Mla Baburao Kohlikar) यांनी आक्रमक पवित्रा घेतलायं. बोर्डिकरांनी नाराजी व्यक्त केलीयं तर कोहळीकरांनी सावेंविषयी पत्र लिहून बॉम्ब टाकलायं.

विक्की डोनरला 13 वर्षांनी पुन्हा थिएटरमध्ये! आयुष्मानने खास थ्रोबॅक पोस्टसह साजरा केला क्षण

हदगावचे आमदार बाबुराव कोहळीकर यांनी सावेंच्या दौऱ्याला विरोध दर्शवला आहे. शिवसैनिकांना घेऊन सावेंविरोधात आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. मतदारसंघातील कामांना शिफारशीशिवाय मंजुरी देत असल्याची आमदार आणि राज्यमंत्र्यांची तक्रार आहे. राज्यमंत्री बोर्डिकर यांनी मंजूर कामांचा निधी रद्द करण्याची मागणी पत्राद्वारे केली आहे.

मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यावर सूर्य तापणार, विदर्भात अवकाळीचं संकट; ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट

माझ्या मतदारसंघात विकासकामं व्हावीत, तांडा वस्तीचा निधी मिळावा, यासाठी राज्यमंत्री मेघना बोर्डिकरांनी शिफारस केली होती. मात्र या पत्राच्या मागणीनुसार एकही काम झालेलं नाही , याउलट दुसऱ्यांना कामे दिली गेली आहेत. माझ्या मतदारसंघात कामे होत असतानाही माझी शिफारस घेतली नसल्याची नाराजी बोर्डिकरांनी व्यक्त केलीयं.

मेधा कुलकर्णींविरोधात नॅशनल कॉन्फरन्स फॉर मायनॉरिटी आक्रमक! दर्ग्यातील गोंधळासाठी अटकेची मागणी

आमदार बाबुराव कदम कोहळीकरांचा लेटरबॉम्ब…
मी महायुतीचा आमदार आहे, पण मी सुचवलेल्या कामांची यादी मान्य न करता विरोधी पक्षाच्या नेत्यांची मंजूर केलेली आहेत. या प्रकार काय आहे हे कळण्यास मार्ग नाही. अतुल सावे मतदारसंघात येतील तेव्हा मोठ्या संख्येने कार्यकर्ते घेऊन आंदोलन करणार असल्याचा इशारा आमदार कोहळीकरांनी दिलायं.

follow us