Download App

नवनीत राणा भाजपात जाण्याची चर्चा, बच्चू कडू म्हणतात, ‘त्यांचं अंतर्मनच भाजपचं…’

  • Written By: Last Updated:

Bachhu Kadu : लोकसभा निवडणूक (Lok Sabha Elections) जवळ येत आहेत, तसे काही बडे नेते भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. आता खासदार नवनीत राणा (Navneet Rana) या देखील भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा आहे. नागपुरात भाजपचा ४ तारखेला मेळावा आहे. या मेळाव्यात त्या भाजपमध्ये (BJP) प्रवेश करतील, अशी शक्यता आहे. यावर आमदार बच्चू कडू (Bachhu Kadu) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी भाजपच्या हेतूवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. शिवाय राणा यांच्यावर तिखट शब्दात टीका केली.

Prakash Ambedkar यांचा महाविकास आघाडीला दणका; तीन उमेदवारांची घोषणाही केली 

बच्चू कडू यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. राणा यांच्या भाजप प्रवेशाविषयी विचारले असता कडू म्हणाले की, नवनीत राणा यांचे अंतर्मनच भाजपचं आहे. आधी त्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पाठिंब्याने निवडून आल्या. तेव्हा राणा हिरवे, भगवे आणि निळे झेंडे घेऊन नाचत होत्या. आता त्या भगवा झेंडा घेऊन फिरतात. हिंदू शेरणी झाल्या आहेत. भाजप आता नवनीत आणि रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाला संपवणार आहे. भाजपमध्ये त्यांना घेऊन त्यांचा स्वाभिमान मारला नाही पाहिजे, असं कडू म्हणाले.

शार्दुल ठाकूरने नवव्या क्रमांकावर झळकावले शानदार शतक, मुंबईचा डाव सावरला 

महाविकास आघाडीतील जागावाटपाचा तिढा अजून सुटला नाही. वंचित बहुजन आघाडी मविआसोबत येणार असल्याचे बोलले जात आहे. मात्र, अनेक बैठका झाल्या तरी वंचित त्यांच्यासोबत असणार की, नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.यावरही बच्चू कडूंनी भाष्य केलं. ते म्हणाले की, प्रकाश आंबेडकर यांची वंचित आघाडी स्वतंत्रपणे लढणार आहे, त्यामुळे महाविकास आघाडीच्या बैठकीला जात नसतील.

यावेळी कडू यांनी भाजपला इशारा दिला. ते म्हणाले, जोपर्यंत विधानसभेची बोलणी होत नाही, तोपर्यंत आम्ही कोणताही विचार केला नाही. भाजपला जशी लोकसभा महत्त्वाची आहे, तशीच आम्हाला विधानसभा महत्त्वाची आहे. अजूनही छोट्या पक्षांशी चर्चा नाही. विधानसभेत किती जागा देणार ते सांगावं नाहीतर आम्ही स्वतंत्र आहोत. आमच्यावर कोणतेही बंधन नाही, असा इशाराही कडू यांनी दिला.

राणा काय म्हणाल्या?
नवनीत राणा यांना प्रसारमाध्यमांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याबाबत विचारले असात त्या म्हणाल्या की, भाजपमध्ये जाणार ही चर्चा नेहमीच सुरू असते. आम्ही बोललो तरी चर्चा होते, आणि नाही बोललो तरी चर्चा असते. आम्ही योग्य वेळी योग्यचं निर्णय घेत असतो, असं म्हणत त्यांनी भाजप प्रवेशाच्या चर्चेवर सूचक संकेत दिले.

follow us