राजकीय भूकंप! ठाकरे गटासह राष्ट्रवादीचे आमदार मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात

Uday Samant on Maharashtra Politics : सध्या राज्याच्या राजकारणात अनेक खळबळजनक घडामोडी घडत आहे. यातच शिंदे गटाच्या एका आमदाराच्या नव्या दाव्याने राजकारणात खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादीमधील आमदार व ठाकरे गटातील आमदार हे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहेत. तसेच काँग्रेसच्या बड्या नेत्यांनी महाबळेश्वर येथे भेट घेतली आहे. असा दावा राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी […]

Untitled Design   2023 04 27T152144.883

Untitled Design 2023 04 27T152144.883

Uday Samant on Maharashtra Politics : सध्या राज्याच्या राजकारणात अनेक खळबळजनक घडामोडी घडत आहे. यातच शिंदे गटाच्या एका आमदाराच्या नव्या दाव्याने राजकारणात खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादीमधील आमदार व ठाकरे गटातील आमदार हे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहेत. तसेच काँग्रेसच्या बड्या नेत्यांनी महाबळेश्वर येथे भेट घेतली आहे. असा दावा राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केला आहे. सामंत यांच्या वक्तव्याने नव्या राजकीय चर्चाना उधाण आले आहे.

शिवसेनेत बंड झाल्यानंतर ठाकरे गट व शिंदे गट निर्माण झाला. यामुळे राज्यात सत्तांतर होऊन महाविकास आघाडीचे सरकार कोसळून शिंदे – फडणवीस सरकार अस्तित्वात आले. दरम्यान आता पुन्हा एकदा राज्यातील राजकारणात भूंकप होईल अशी बातमी समोर आली आहे.

नेमकं काय म्हणाले मंत्री सामंत?
खारघर घटनेनंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पदावर हटवले जाईल, अशा चर्चाना उधाण आले होते. याबाबत मंत्री सामंत यांना विचारण्यात आले. यावेळी बोलताना सामंत म्हणाले, या सगळ्या निरर्थक चर्चा आहे. असे काही नाही आहे.

उलट ठाकरे गटातली उरलेले 13 आमदार हे देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहेत. त्यासोबत राष्ट्रवादीचे 20 आमदार आणि काँग्रेसचे बडे नेते देखील शिंदेंच्या संपर्कात आहेत, असे वक्तव्य त्यांनी केले आहे. काँग्रेसचे बडे नेते काल महाबळेश्वरला शिंदे यांना भेटले अशीही चर्चा आहे, असा गौप्यस्फोट करतानाच चर्चा भरपूर होऊ शकतात. पण ते सत्यात उतरलं पाहिजे, असं उदय सामंत म्हणाले.

बापरे! मुंबई-पुणे महामार्गावर 11 गाड्या एकमेकांवर चढल्या…

राजकीय उलथापालथ
राज्यातील राजकारणात कधी काय होईल, हे कोणी सांगू शकत नाही. दररोज वेगवेगळ्या राजकीय घटना घडत आहे. दरम्यान एकनाथ शिंदे यांच्या बंडावेळी उद्धव ठाकरे यांची साथ सोडून गेलेले अनेक आमदार पुन्हा ठाकरेंच्या गटात परतणार असल्याच्या चर्चा सुरू आहे. पक्ष सोडून गेलेले कुणी परत येणार असतील तर त्याबाबतचा निर्णय पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि वरिष्ठ घेतील, असे सूचक विधान ठाकरे गटाच्या उपनेत्या आणि उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी केले आहे. एकीकडे हे सगळं असताना आता दुसरीकडे मात्र उदय सामंत यांनी केलेल्या या दाव्यामुळे पुन्हा नव्या चर्चांना उधाण आले आहे.

Exit mobile version