Dhananjay Munde Winter Session Speak : गेल्या काही दिवसांपासून ओबीसी आंदोलकांवर हल्ले होत असल्याचं प्रमाण वाढल्याचं चित्र दिसदून येत आहे. या मुद्द्यावर आमदार धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी आज विधान मंडळाच्या सभागृहात आवाज उठवलायं. या हल्ल्यांविरोधात सरकारकडून उपाययोजना कारवाई करण्याची मागणी यावेळी धनंजय मुंडे यांनी केलीयं. मुंडे यांच्या या मागणीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकाच वाक्यात उत्तर देऊन विषय संपवलायं. ओबीसी आंदोलकांवरील हल्ल्याबाबत कडक कारवाई करण्यात येणार असल्याचं प्रत्युत्तर फडणीस यांनी सभागृहात दिलंय.
लवकरच देशात मोठा राजकीय भूकंप, भारताचा पंतप्रधान मराठी माणूस; पृथ्वीराज चव्हाण यांचा दावा…
या मुद्द्यावर बोलताना आमदार मुंडे म्हणाले, राज्यात मागील काही दिवसांपासून सामाजिक आंदोलन उभं करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांवर हल्ले घडवून आणले जात आहेत. याआधी लक्ष्मण हाके यांचा सहकारी पवन कंरवकर यांच्यावर हल्ला घडवून आणण्यात आला. एका झुंडीने त्यांचे थेट हातपाय तोडले आहेत. या प्रकरणात अद्याप एकही आरोपी पकडण्यात आलेला नसतानाच काल रात्री ओबीसी आंदोलक मंगेश ससाणे यांच्या वाहनावर हल्ला केल्याची घटना घडलीयं. राज्यात समाजिक शांततातच संपली आहे, एकमेकांना मारुन लोकं योद्धा म्हणून त्याचा गौरव करीत असल्याचं धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केलंय.
रणवीर-अक्षय खन्नाची बॉक्स ऑफीसवर धुरंधर कामगिरी; सलग दुसऱ्या शुक्रवारी उच्चांकी कमाई
तसेच ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांच्यावरही हल्ला केल्याच्या दोन तीन घटना घडल्या आहेत. त्यानंतर नवनाथ वाघमारे यांच्यावरही हल्ला केला. सामाजिक आंदोलन करणारा कार्यकर्ता महाराष्ट्रात सामान्यरीत्या फिरु शकतो का? राज्यात सामाजिक समताच संपलीयं, एकमेकांना मारुन योद्धा पुकारलं जातं अटक होत नाही हे दुर्देव
एका भावाला शिक्षा तर दुसऱ्यालाही झाली पाहिजे, अशी मागणी धनंजय मुंडे यांनी केलीयं.
दरम्यान, ओबीसी आंदोलक मंगेश ससाणे यांच्या गाडीवर काल रात्रीच्या सुमारास हल्ला झाल्याची घटना घडली. बीडच्या धारुर-इंदापूर मार्गावर ही घटना घडली असून दोन दुचाकीस्वारांनी मागील बाजूने दगडफेक केल्याचं ससाणे यांनी आपल्या फेसबुक लाईव्ह व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. या प्रकरणी ससाणे यांनी धारुर पोलिस ठाण्यात रितसर तक्रार देऊन गुन्हा दाखल करणार असल्याचंही स्पष्ट केलंय.
