Download App

आमदार गणपत गायकवाड यांना मतदान करू देऊ नये, कॉंग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे मागणी

काँग्रेसने निवडणूक अधिकाऱ्यांना सविस्तर पत्र लिहून आमदार गणपत गायकवाड यांना मतदान करू देऊ नये, अशी मागणी केली.

  • Written By: Last Updated:

Vidhanparishad Election : विधानपरिषदेच्या (Vidhanparishad Election) 11 जागांसाठी मतदानाला सुरूवात झाली आहे. जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीत 12 उमेदवार मैदानात असल्याने या निवडणुकीत चुरस वाढली आहे. दरम्यान, तुरूंगात असलेले भाजप आमदार गणपत गायकवाड (MLA Ganpat Gaikwad) हे देखील या निवडणुकीत मतदान करणार असल्याची माहिती आहे. मात्र, कॉंग्रेसने (Congress)गायकवाड यांना मतदान करू देऊ नये, अशी मागणी कॉंग्रेसने केली आहे.

लेक एकपट आई पाचपट; मनोरमा खेडकरने बळकावली जमीन, पिस्तूल काढून शेतकऱ्यांना भरला दम 

काँग्रेसने निवडणूक अधिकाऱ्यांना सविस्तर पत्र लिहून आमदार गणपत गायकवाड यांना मतदान करू देऊ नये, अशी मागणी केली. लोकप्रतिनिधी कायद्यातील तरतुदीनुसार गणपत गायकवाड यांना मतदान करता येत नाही, त्यामुळे त्यांना मतदान करू देऊ नये, अशी मागणी काँग्रेसने केली आहे.

संजय राऊतांचीही टीका 

सध्या गायकवाड हे गोळीबार प्रकरणात तुरुंगात आहेत. मात्र, त्यांना विधान परिषदेच्या मतदानासाठी बाहेर सोडण्यात आलं आहे. त्यावर संजय राऊत यांनी जोरदार टीका केली आहे. ते म्हणाले, गायकवाड मतदानासाठी तुरुंगाबाहेर येऊ शकतात. मात्र, शरद पवार गटाचे नवाब मलिक हे मतदानासाठी नाही येऊ शकले, अनिल देशमुख यांनाही येऊ दिलं नाही. परंतु, गणपत गायकवाड येऊ शकतात. यालाच म्हणतात सत्तेचा गैरवापर, यालाच म्हणतात दादागिरी, अशी टीका राऊतांनी केली.

मुंबईत जोरदार पाऊस; रेल्वेच्या वेळापत्रकावर परिणाम, ‘Mlc’ मतदानाची वेळ वाढवण्याची मागणी फेटाळली 

गायकवाड तुरुगात का ?
भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी काही महिन्यांपूर्वी उल्हासनगर पोलीस स्टोशनमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे पदाधिकारी महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला होता. तेव्हापासून तुरूंगात असलेले गणपत गायकवाड आता विधान परिषद निवडणुकीच्या मतदानासाठी तुरूंगाबाहेर येणार आहेत. या निवडणुकीत मतदान करता यावे यासाठी गायकवाड यांनी कल्याण अतिरिक्त जिल्हा न्यायालयाला विनंती अर्ज केला होता, तो मान्य करण्यात आला आहे.

दरम्यान, कॉंग्रेसने गायकवाड यांनी मतदान करू देऊ नये, अशी मागणी केली. त्यामुळं गायकवाडांना मतदान करता येणार का, हेच पाहणं महत्वाचं आहे.

शहाजी बापू रुग्णालयात…
या निवडणुकीत आमच्याकडे 1 मत अतिरिक्त आहे. त्यामुळे आमच्या दोन जागा सहज निवडून येतील. आम्ही खबरदारी म्हणून 1 मत अतिरिक्त ठेवलेले आहे, असं शिवसेना प्रवक्ते दीपक केसरकर यांनी सांगितलं. मात्र, शिवसेनेचे फायरब्रॅंड नेते शहाजी बापूर हे आजारी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे.

 

follow us