Download App

भुजबळांना कोणीही डॉमिनेट करू शकत नाही, त्यांच्यामागे…; गोपीचंद पडळकरांचं मोठं विधान

भुजबळ साहेबांना कोणीही डॉमिनेट करू शकत नाहीत, त्यांच्यामागे ओबीसींची मोठी ताकद आहे, असं विधान आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलं.

Gopichand Padalkar Met Chhagan Bhujbal : भुजबळ साहेबांना कोणीही डॉमिनेट करू शकत नाहीत, त्यांच्यामागे ओबीसींची मोठी ताकद आहे, असं विधान धनगर समाजाचे नेते आणि आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलं. पडळकर यांनी आज मंत्री छगन भुजबळ ( Chhagan Bhujbal) यांची भेट घेतली. नाशिकच्या भुजबळ फार्मवर भुजबळ आणि पडळकर या दोन नेत्यांमध्ये बैठक पार पडली. यानंतर माध्यमांशी बोलताना गोपीचंद पडळकर यांनी हे वक्तव्य केलं.

मोफत वीज, मोफत शिक्षण, पिकांनाही हमीभाव…; अरविंद केजरीवालांनी दिल्या 10 गॅरंटी 

ऐन लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत पडळकर यांनी भुजबळांची भेट घेतल्यानं या दोन ओबीसी नेत्यांमध्ये काय शिजतयं याची चर्चा रंगू लागली आहे. दरम्यान, या भेटीनंतर पडळकरांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी या भेटीविषयी भाष्य केलं. पडळकर म्हणाले, काल नाशिकमध्ये धनगर समाजाचा कौटुंबिक स्नेह मेळावा होता. या मेळाव्याच्या निमित्ताने मी नाशिकमध्ये आलो होतो. आज महायुतीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांची भेट घेतली. या भेट घेण्यामागे काही विशेष कारण नाही. ते आमचे नेते असल्यानं नाशिकमध्ये आल्यानंतर भुजबळ साहेबांना भेटलं पाहिजे, या निरपेक्ष भावनेनं मी त्यांना भेटलो.

अमेरिकेचा नवा ‘स्क्वॉड’! चीनला धक्का, भारतालाही टेन्शन; नवा प्लॅन काय? 

पडळकर म्हणाले, महायुती लोकसभा निवडणूक ताकदीने लढवत आहे. महायुतीतील प्रमुख नेत्यांपैकी एक नेते भुजबळ साहेब आहेत. त्यामुळं अनेक नेते त्यांना भेटतात. मी एक कार्यकर्ता आहे. भुजबळ साहेबांसोबत चळवळीत आहे. त्यामुळे माझी भेट वेगळी आणि वरिष्ठ नेते भेटताात ती वेगळी भेट असते.

ते पुढे म्हणाले की, छगन भुजबळ यांना कोणीही डॉमिनेट करू शकत नाही. महाराष्ट्रातील ओबीसींची मोठी ताकद भुजबळ साहेबांच्या पाठीमागे आहे. भुजबळ साहेबांनी निवडणूक लढवणार नाही अशी स्पष्ट भूमिका घेतली होती. ओबीसींची ताकद तीच आहे आणि ही ताकद पुढे वाढेल, असं पडळकर म्हणाले.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून राजकीय नेतेमंडळी भुजबळ फार्मवर येत आहेत. नाशिक लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार हेमंत गोडसे, धुळे लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार सुभाष भामरे, दिंडोरीच्या भाजपच्या उमेदवार भारती पवार, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री गिरीश महाजन यांनीही याआधी भुजबळांची भेट घेतल्यानं भुजबळ फार्म हे राजकारणाचे मुख्य केंद्र बनल्याचं दिसत आहे.

 

 

follow us

वेब स्टोरीज