Jitendra Awhad : शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीचा समावेश करण्याचा मुद्दा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. त्याविरोधात काल आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी निषेध आंदोलन करत मनुस्मृती ग्रंथाचे दहन केलं होतं. मात्र यावेळी आव्हाड यांच्याकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Babasaheb Ambedkar) यांचा फोटो असलेले पोस्टरही फाडण्यात आल्याचं समोर आलं. त्यामुळं भाजपने (BJP)आव्हाड यांच्यावर जोरदार टीका केली. भाजपने राज्यभरात जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत. दरम्यान, आता आव्हाड यांनी यावर प्रतिक्रिया दिली.
Danka Hari Namacha : ‘डंका… हरी नामाचा’ चित्रपटात ‘या’ नामवंत कलाकारांची मांदियाळी
आज आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलतांना आव्हाडांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. ते म्हणाले काल आमच्याकडून झालेल्या चुकीबद्दल मी माफी मागितली आहे. माझ्याकडून अवनावधाने ही चूक घडली. त्यानंतर आमच्यावर गुन्हे दाखल झाले, मला फाशी द्या. पण मी मनुवादी आणि मनुस्मृतीच्या विरोधात उभा राहणार आहे, मी मरणाला न घाबरणारा कार्यकर्ता आहे, माझ्यावर दाखल झालेले गुन्हे झेलायला मी तयार आहे, असं आव्हाड म्हणाले. मला पुढं करून मनुस्मृती लपवायचा प्रयत्न सुरू असल्याचंही ते म्हणाले.
Sanya Malhotra: सान्या मल्होत्राला मिसेस’साठी मिळाले सर्वोत्त्कृष्ट अभिनेत्रीचे नामांकन
पुडं बोलतांना ते म्हणाले की, माझ्या हातून चूक झाली, त्याबद्दल मी जे काही बोलायत ते बोललो. आंबडेकरांवर प्रेम करणाऱ्या जनतेची माी माफी मागितली. महात्मा फुलेंबद्दल बोलल्याबद्दल कोश्यारींनी माफी मागितली का? चंद्रकांत पाटील ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलले होते, त्यावेळी त्यांनी माफी मागितली होती का? कोश्यारी यांनी जेव्हा ते वक्तव्य केलं होतं, तेव्हा भाजपवाल्यांनी कोश्यारी टीका का केली नाही, असा सवालही आव्हाडांनी केला.
भाजप आणि माझ्यात वैचारिक मतभेद आहेत, त्यांच्यात आणि माझ्यात वैचारिक मतभेद आहेत ते मनुस्मृती, धर्मामुळे. पवार साहेबांची जी भूमिका आहे, तिच भूमिका माझा आहे. मनुस्मृतीमध्ये मातेबद्दल वाईट लिहिले आहे, त्यामुळं मनुस्मृती मलाला मान्य नाही. त्यांनी मला फाशी दिली तरी मी मनुस्मृतीच्या विरोधात उभा राहीन. महिलांना मनुस्मृतीत शिक्षण घेण्याचा अधिकार नाही. त्यामुळं मनुस्मृतीला विरोध करणार असल्याचेही आव्हाड म्हणाले.