Download App

चीनचा मुद्दा आला की सरकारची दातखिळी बसते, केवळ चीनी अ‍ॅप्सवर बंदी घालून…; आव्हाडांचे टीकास्त्र

  • Written By: Last Updated:
Image Credit: Letsupp

Jitendra Awhad on Modi Goverment : जम्मूच्या पूर्व लडाखमधी (East Ladakh) नियंत्रण रेषेजवळ चीनने पुन्हा एकदा दादागिरी केल्याचा प्रकार समोर आला आहे. चीनच्या पीपल्य लिबरेशन आर्मीच्या (पीएलए) सैनिकांनी भारतीय मेंढपाळांना रोखण्याचा प्रयत्न केला. यावर निशस्त्र भारतीय मेंढपाळांनी धाडस दाखवत सशस्त्र चिनी सैनिकांना चांगलचं प्रत्युत्तर दिलं. हा भारताचा भूभाग असून या भागात मेंढ्यांना चरण्यासाठीचं आहे, त्यामुळं आपण ही जागा सोडणार नाही, अशी भूमिका मेंढपाळांनी घेतली. भारतीय मेंढपाळ आणि चिनी सैनिकांमध्ये (Chinese soldiers) चांगलीच झटापटही झाली. हा थरारक व्हिडिओ समोर आल्यानंतर भारतीय मेंढपाळांचे कौतुक होत असून केंद्र सरकारवर टीका होत आहे. राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हा (Jitendra Awhad) यांनीही केंद्र सरकारवर टीका केली आहे.

शिखर बॅंक घोटाळा : रोहित पवारांची ईडीकडून चौकशी तर पोलिसांकडून फाईल बंद…उलटफेर कोणाचा? 

केंद्र सरकारची चीनचा मुद्दा आली की दातखिळी बसते केवळ चिनी अॅपवर बंदी घालून सामान्यांच्या डोळ्यात धूळफेक करणाऱ्या या सरकारच्या हातात भारताच्या सीमा सुरक्षित नाहीत, अशी टीका आव्हांनी केली.

Manoj Jarange : ओबीसींच्या सभा घेतल्याने भुजबळांवरील तीन केसेस मागे; जरांगे यांचा गंभीर आरोप 

आव्हाड यांनी या घटनेचा व्हिडिओ एक्सवर शेअर केला. त्यांनी लिहिलं की, ‘संपूर्ण देशाला देशप्रेमाचं धडे देणारं आणि देशभक्तीचा मक्ता मिळवणाऱ्या केंद्र सरकारची चीनचा मुद्दा आली की दातखिळी बसते. 2 जानेवारी रोजी एळओसी नसजिकच्या पेट्रोलिंग पॉईंट (PP) 35 आणि 36 जवळ शुट केलेल्या व्हिडिओमध्ये चिनी सैनिक आणि स्थानिक भारतीय मेंढपाळांमधील हाणामारी स्पष्टपणे दिसून येत आहे. एप्रिल-मे 2020 पासून या भागात भारतीय सैनिकांनी पेट्रोलिंग बंद केलंय. इथल्या अनेक ठिकाणी यापूर्वी पेट्रोलिंग केली जात असे. त्या प्रदेशाला बफर झोन म्हणून घोषित करण्यात आलंय. एवढचं नव्हे तर परमवीर चक्राने सन्मानित मेजर शैतान सिंह यांची समाधीदेखील तोडण्यात आली आहे, असं आव्हाड यांनी लिहिलं.

यावेळी आव्हाड यांनी भाजप आणि केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. त्यांनी लिहिलं की, एरव्ही समाजमाध्यमांवरील धार्मिक मुद्दयांशी निगडीत फेक व्हिडिओवरून प्राईम टाईम चर्चा घेणारं गोदी मीडिया आता मात्र मूग गिळून बसले आहेत. केवळ चिनी अॅपवर बंदी घालून सामान्यांच्या डोळ्यात धूळफेक करणाऱ्या या सरकारच्या हातात भारताच्या सीमा सुरक्षित नाहीत, हे ढळढळीत वास्तव पुन्हा एकदा समोर आलं आहे, अशी टीका आव्हाड यांनी केली.

follow us

वेब स्टोरीज