चिनी सैनिकांकडून लडाखमध्ये भारतीय मेंढपाळांना धक्काबुक्की, व्हिडिओ व्हायरल

चिनी सैनिकांकडून लडाखमध्ये भारतीय मेंढपाळांना धक्काबुक्की, व्हिडिओ व्हायरल

India-China LAC: लडाखमध्ये (Ladakh) चिनी सैनिकांनी भारतीय मेंढपाळांना (India-China LAC) अडवून त्यांना धक्काबुक्की केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यावरुन काँग्रेसने (Congress) केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. या व्हिडिओमध्ये चिनी सैनिक मेंढपाळांना धक्काबुक्की करताना आणि वाद घालताना दिसत आहेत. काँग्रेसने हा व्हिडिओ आपल्या अधिकृत ट्विटर (X) हँडलवरून ट्विट केला आहे.

द इंडियन एक्स्प्रेसमधील वृत्तानुसार, लडाखमधील मेंढपाळ LAC वर मेंढ्या चरत होते, यावेळी त्यांना चिनी सैनिकांनी रोखले आहे. ही घटना पूर्व लडाखमधील न्योमा येथे घडली. न्योमा चुशूलच्या दक्षिणेस 87 किमी आणि चुमथांगपासून 40 किमी आहे. या घटनेचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. स्थानिकाने दिलेल्या माहितीनुसार, चिनी सैनिकांनी भारतीय मेंढपाळांना रोखण्याची घटना 2 जानेवारी रोजी घडली होती.

ज्ञानवापी प्रकरणात मोठा निर्णय! मशिदीच्या तळघरात पूजा करण्याचा मिळाला अधिकार

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तलावाजवळ तीन चिनी वाहने आणि अनेक सैनिक दिसत आहेत. अलार्म वाजवणारी वाहने मेंढपाळांना निघून जाण्याचा इशारे देत आहेत, पण भारतीय मेंढपाळ त्यांच्या भूमिकेवर ठाम आहेत. निघून जाण्यास नकार देत चिनी सैनिकांशी वाद घालताना दिसत आहेत. मेंढपाळांचे म्हणणे आहे की ते भारतीय हद्दीत प्राणी चारत आहेत. त्यांचे आजोबाही या भागात मेंढ्या चरत होते. धक्काबुक्की वाढत असल्याचे पाहून काही मेंढपाळ दगड उचलतानाही दिसत आहेत.

हेमंत सोरेन यांची ED कडून कसून चौकशी सुरू; अटक झाल्यास आमदारांच्या सह्यांसह प्लॅन B अन् C तयार

2020 मध्ये भारत-चीन संघर्षानंतर लडाखमध्ये तणाव
2020 मध्ये लडाख भागात भारतीय सैनिक आणि चिनी सैन्य यांच्यात झालेल्या संघर्षानंतर तेथील वातावरण तणावपूर्ण बनले होते. हा तणाव कमी करण्यासाठी लष्करी स्तरापासून बैठका आयोजित करण्यात आल्या होत्या. सरकारचा दावा आहे की, या बैठकींमुळे लडाखमधील भारत-चीनमधील तणाव बऱ्याच अंशी कमी झाला आहे.

झारखंडमध्येही राबडीदेवी पॅटर्न? CM होण्याची चर्चा असलेल्या कल्पना सोरेन आहेत तरी कोण?

follow us
  • fb
  • instagram
  • youtube