Laxman Pawar : विधानसभा निवडणुका (Vidhansabha Election) जसजशा जवळ येत आहेत, तसे महायुतीत (Mahayuti) खटके उडायला लागले आहेत. बीड जिल्ह्यातील गेवराईचे भाजप आमदार लक्ष्मण पवार (Laxman Pawar) यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. आपण किंवा कुटुंबातील कोणीही निवडणूक लढवणार नाही, असं त्यांनी म्हटलं होतं. त्यानंतर त्यानंतर आज त्यांनी पालकमंत्र्यांसह त्यांच्या पक्षाच्या कार्यप्रणालीवर बोट ठेवलं.
‘एवढचं वाटतंय तर आधी महापालिका, नगरपालिकांच्या निवडणुका घ्या’; राज ठाकरेंची टीका
आमदार लक्ष्मण पवार यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलतांना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. यावेळी बोलतांना त्यांनी धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार टीका केली. गेवराई विधानसभा मतदारसंघात चांगले अधिकारी द्या म्हणून अनेक वेळा पक्षाला विनंती केली. मात्र, वाळूचा धंदा करणारे पोलीस आणि महसूल अधिकाऱ्यांना इथं आणलं जात आहे. पालकमंत्र्यांनी सर्व भ्रष्ट अधिकारी व कर्मचाऱ्यांना गेवराईत आणून ठेवलं.
जम्मू-काश्मीरमधील निवडणुकीचा पहिला टप्पा संपला, 24 जागांवर 58.85 टक्के मतदान
निवडणूक न लढवण्याची घोषणा केली, आपण पक्षावर नाराज आहात का, असं विचारलं ते असता पवार म्हणाले की, पक्षावर नाराज नाही. पण, पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्याबद्दल पक्षाकडे अनेक तक्रारी करून, अनेकदा सांगूनही त्यावर काही कार्यवाही होत नाही. त्यामुळे हताश होऊन मी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे.
पंकजाताई सतत मुंबईतच राहायच्या…
पुढं बोलतांना ते म्हणाले, 2019 मध्ये विधानसभा निवडणूक झाल्यानंतर पंकजाताईंनाही सांगितलं की, ताई तुम्ही बीड जिल्ह्यात नाही आल्या तरी चालेलं. आम्हाला मुंबईला बोलावा. आपण विरोधी पक्ष म्हणून बीड जिल्ह्यात चांगली भूमिका निभावू. पण, पंकजाताईंनी कधीच वेळ दिला नाही. त्या सतत मुंबईत राहायच्या. इथं भाजप कार्यकर्त्यांवर खूप अत्याचार झाला. याबाबत वरिष्ठांना अनेकदा सांगितले पण कोणीही ऐकले नाही. माझा स्वभाव हट्टी नाही, मात्र, वारंवार सुचना करूनही दखल घेतली गेली नाही, अशी खंत आमदार लक्ष्मण पवार यांनी व्यक्त केली.
पवार म्हणाले की, जनतेने मला दोनदा निवडून दिले. मात्र मी निवडणूक लढवणार नाही, असे जाहीर केल्यानंतर लोकांना वेठीस धरणाऱ्या कुटुंबाच्या हाती जनतेची सत्ता द्यायची का, असा प्रश्न सर्व सामान्य जनतेला पडला आहे. त्यामुळं जे इच्छुक आहेत, त्यांची नाव मागितली, येत्या 15 दिवसांत आम्ही निर्णय घेऊ, असं पवार म्हणाले.