Nilesh Rane on Sanjay Raut: राज्यात गेल्या काही दिवसांपासून हनी ट्रॅपची (Honey Trap) चांगलीच चर्चा सुरू आहे. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ना हनी आहे, ना ट्रॅप आहे, असं सांगत या गोष्टीचा साप इन्कार केला होता. त्यानंतर खासदार संजय राऊतांनी (Sanjay Raut) मुख्यमंत्री दिशाभूल करत असल्याचा आरोप केला होता. यावरून यावरून शिंदे गटाचे आमदार निलेश राणे (Nilesh Rane) यांनी राऊतांवर जोरदार हल्लाबोल केला.
एकेरी गट आरक्षणावरील 30 टक्के भाडेवाढ रद्द; मंत्री प्रताप सरनाईकांची मोठी घोषणा
निलेश राणेंनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. दरम्यान, राऊतांच्या वक्तव्याविषयी विचारले असता ते म्हणाले की, मी त्यांचं नाव सुद्धा घेणार नाही. हनी ट्रॅप हा सभागृहात शेवटच्या दिवशी चर्चेला आलेला विषय होता. हनी ट्रॅपमध्ये काँग्रेसाच नेता आहे, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. नाना पटोले यांच्या समोर मुख्यमंत्र्यानी हे स्पष्ट केलं आहे. त्याची आता चौकशी पोलीस करतील. पोलीस तपासात सर्व उघड होईलच, असं राणे म्हणाले. तसेच विधिमंडळात ज्यावेळी हनी ट्रॅपवर चर्चा झाली, त्यावेळी त्यावेळी संजय राऊत कुठे तरी फुकत बसले असतील, असा टोलाही त्यांनी लगावला.
सर्पमित्रांना 10 लाखांचा विमा अन् फ्रंटलाइन वर्करचा दर्जा; मंत्री बावनकुळेंची CM फडणवीसांना शिफारस
पुढं ते म्हणाले, संजय राऊत यांच्या कुठल्याही फालतू स्टेटमेंटला मी उत्तर देणार नाही. संजय राऊत म्हणजे महाराष्टाचे प्रवक्ते आहेत का? सरसंघचालक यांच्यावर बोलायची यांची औकाद आहे काय?, असा सवाल त्यांनी केला.
शिंदे गटात सातत्याने प्रवेश होत आहे. याविषयी बोलताना आमदार राणे म्हणाले, लोकांचे प्रवेश आमच्या पक्षांमध्ये होतात कारण, आमच्या पक्षात आल्यावर न्याय मिळेल आणि सर्वसामान्यांची कामे होतील, असा विश्वास लोकांना आहे. त्यामुळं एकनाथ शिंदे यांच्या कामावर विश्वास ठेवून आमच्या पक्षात पक्षप्रवेश होत आहे. येणाऱ्या काळात अजून मोठे पक्षप्रवेश होणार आहेत, असं राणे म्हणाले.
यावेळी राणेंनी विनायक राऊत यांच्यावरही जोरदार हल्लाबोल केला. विनायक राऊत यांची रिटायरमेंट जवळ आली आहे. त्यांना लोकांनी रिटायर केले आहे, पण ते स्वतःहून मान्य करत नाहीत. येणाऱ्या निवडणुकीत रत्नागिरीत शिवसेनेची ताकद काय आहे हे आम्ही त्यांना दाखवून देऊ, असं राणे म्हणाले.