सर्पमित्रांना 10 लाखांचा विमा अन् फ्रंटलाइन वर्करचा दर्जा; मंत्री बावनकुळेंची CM फडणवीसांना शिफारस

सर्पमित्रांना 10 लाखांचा विमा अन् फ्रंटलाइन वर्करचा दर्जा; मंत्री बावनकुळेंची CM फडणवीसांना शिफारस

Chandrashekhar Bawankule : राज्य सरकारने सर्पमित्रांसाठी मोठा निर्णय घेण्याचा विचार सुरू केला आहे. राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज याबाबतीत महत्वाची माहिती दिली. शासनाकडून सर्पमित्रांना 10 लाख रुपयांचा अपघाती विमा मिळेल. सर्पमित्रांना फ्रंटलाइन वर्करचा दर्जा देत हा लाभ देण्यात येईल, याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडे शिफारस केली आहे अशी माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी (Chandrashekhar Bawankule) दिली. बावनकुळे यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी याबाबत माहिती दिली.

बावनकुळे पुढे म्हणाले, ग्रामीण भागात वन्यजीव आणि मानवी संघर्ष टाळण्यासाठी सापांपासून होणारे धोके टाळण्यात सर्पमित्रांची मोलाची भूमिका असते. त्यामुळे आता या सर्पमित्रांना लवकरच अधिकृत ओळखपत्र दिले जातील. त्यांना दहा लाख रुपयांचा अपघाती विमा शासनामार्फत दिला जाणार आहे. तसेच या सर्पमित्रांना अत्यावश्यक सेवा आणि फ्रंटलाइन वर्कर म्हणून दर्जा देण्याबाबत सकारात्मक विचार सुरू आहे. याबाबच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे शिफारस करण्यात येईल असे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.

“हर्षल पाटील सब काँट्रॅक्टर सरकार त्याचे..”, अजित पवारांच्या उत्तराने नवा ट्विस्ट!

घरात किंवा परिसरात साप निघाला की सगळ्यांचीच भीतीने गाळण उडते. अशा परिस्थितीत काही सुचत नाही. मग सर्पमित्रांना बोलावले जाते. सर्पमित्र सापाला पकडून निसर्गा मुक्त करतात. काही वेळा साप पकडताना गंभीर दुखापतही सर्पमित्रांना होते. पण फक्त धोका पत्करून साप पकडण्याचे काम पूर्ण होत नाही. यासाठी योग्य प्रशिक्षण आणि वारंवार केला जाणारा सराव यांची गरज असते. साप पकडल्याचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले जातात. त्यामुळे साप पकडणारे खरंच सर्पमित्र आहेत की केवळ प्रसिद्धीसाठी या गोष्टी केल्या जातात असा प्रश्न अनेकांना पडतो.

तरीही सर्पमित्रांची गरज आहेच. या गोष्टी विचारात घेऊन आता यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. याकामी राज्य सरकारने पुढाकार घेतल्याचे दिसून येत आहे. सर्पमित्रांसाठी अपघाती विमा तसेच त्यांना अधिकृत ओळखपत्र देण्याचा विचार सुरू आहे. या प्रस्तावाला जर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजुरी दिली तर पुढील कार्यवाही सुरू होईल. आता मुख्यमंत्री यावर काय निर्णय घेतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

मी किर्तनात अन् भाऊ कलाकेंद्रात ऐकून शॉक… दौंड कला केंद्र गोळीबारावर आमदार मांडेकरांची प्रतिक्रिया

follow us
  • fb
  • instagram
  • youtube