“हर्षल पाटील सब काँट्रॅक्टर सरकार त्याचे..”, अजित पवारांच्या उत्तराने नवा ट्विस्ट!

“हर्षल पाटील सब काँट्रॅक्टर सरकार त्याचे..”, अजित पवारांच्या उत्तराने नवा ट्विस्ट!

Ajit Pawar News : सांगलीच्या एका हर्षल पाटील ( Harshal Patil) नावाच्या अभियंत्याने आत्महत्या केली आहे. तो जलजीवन मिशनचा अभियंता असल्याचं सांगितलं जातं. काम केली परंतु कामांचे पैसे मिळाले नाहीत म्हणून त्याने आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं अशी चर्चा सुरू आहे. राज्य सरकारवर विरोधकांकडून टीकेची झोड उठली आहे. या सगळ्या घडामोडींवर आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रथमच भाष्य केलं. माझ्या माहितीनुसार हे कंत्राट दुसऱ्या कंत्राटदाराला दिलं होतं. त्याने यात सब काँट्रॅक्टर नेमला होता अशी माहिती अजित पवार यांनी प्रसारमाध्यमांना दिली.

या घटनेची माहिती मी घेतली आहे. माझ्याकडील माहितीनुसार हे कंत्राट दुसऱ्या एका कंत्राटदाराला दिलं होतं. त्याने या कंत्राटासाठी सब काँट्रॅक्टर नियुक्त केले होते. आमचा संबंध मुख्य काँट्रॅक्टरशी येतो. उद्या तुम्ही कंत्राटदार म्हणून एखादं काम घेतलं आम्ही तुम्हाला काम दिलं. मग तुमची बिले येतील तसे पैसे आम्ही देऊ. पण जर तुम्ही आणखी एका व्यक्तीला सब काँट्रॅक्टर म्हणून नेमलं तर त्या सब काँट्रॅक्टरला पैसे देण्याचा अधिकार आमचा नाही. तो अधिकार तुमचा आहे.

हर्षल पाटीलच्या नावावर कोणतंच काम नाही, गुलाबराव पाटलांचा धक्कादायक खुलासा

जलजीवन योजना केंद्र सरकारची योजना आहे. या योजनेत केंद्राचा 50 टक्के आणि राज्याचा 50 टक्के निधी आहे. त्यांचा निधी येईल तसे आपण तिथे अधिकचे पैसे देतो. कधी आपल्याकडील निधीतूनही पैसे दिले जातात. त्यामुळे आम्ही थेट कंत्राट त्यांना दिलेलं नव्हतं. तरी पण एखाद्याचा जीव जाणं त्याने आत्महत्या करणं यामागे नेमकी काय कारणे आहेत याचा तपास पोलीस करत आहेत असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.

हर्षलने आत्महत्या का केली?

सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील तांदुळवाडी गावात एक धक्कादायक घटना घडली. हर्षल पाटील या स्थानिक सरकारी कंत्राटदाराने आत्महत्या केल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. सरकारी कामाचा मोबदला वेळेत न मिळाल्यामुळे आलेल्या मानसिक तणावातून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप संबंधित कंत्राटदार संघटनेकडून करण्यात आला आहे.

हर्षल पाटील यांनी राज्य सरकारच्या विविध योजनांअंतर्गत ठेकेदारी केली होती. मात्र, काम पूर्ण करूनही त्यांना त्यांच्या बिलांचे पैसे मिळत नसल्याने ते गेल्या काही काळापासून नैराश्यग्रस्त होते, अशी माहिती त्यांच्या सहकाऱ्यांनी दिली. या प्रकारामुळे सरकारी यंत्रणेवर पुन्हा एकदा बोट ठेवले जात असून, शासनाच्या विलंबित देयक प्रणालीवर प्रश्न उपस्थित होत आहेत.

आज हर्षल पाटील गेलाय..पण 90 हजार कोटी थकलेल्या कंत्राटदारांचे काय ?

follow us
  • fb
  • instagram
  • youtube