डिव्हायडर, कुत्री अन् ग्रामपंचायत ग्रामस्थांनी तक्रारी करताच अजित पवारांची तुफान फटकेबाजी
Ajit Pawar हे आज बारामतीच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी झालेल्या सभेमध्ये त्यांनी तुफान फटकेबाजी केल्याचं पाहायला मिळालं.

Ajit Pawar lashes out as soon as villagers complain about dividers, dogs and the Gram Panchayat : उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज बारामतीच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी विविध विकास कामांची पाहणी केली. त्यावेळी झालेल्या सभेमध्ये त्यांनी तुफान फटकेबाजी केल्याचं पाहायला मिळालं. अजित पवार म्हणाले की, ज्याला कंत्राटदार बनायचं त्याने राजकारणात येऊ नका. त्यामुळे आमची पंचाईत होते. कारण आम्ही फडाफड बोलतो. चांगल काम झालं नाही तर आम्ही निधी देत नाही. दिलेल्या निधीच्या पै अन् पैचा आम्हाला हिशोब लागतो. अशा प्रकारे आमची सगळ्यांची कामाची पद्धत आहे.
धक्कादायक! पंढरपुरमध्ये विठ्ठल मंदिरातील कर्मचाऱ्यांना चिकन मसाल्याच्या पाकिटांचं वाटप
दरम्यान यावेळी एक जण व्यासपीठावर आला त्याने ग्रामस्थांच्या काही तक्रारींचा पाढा वाचला. तेव्हा अजित पवारांनी त्यांच्या खास शैलीमध्ये कधी टोले लगावले तर कधी चिमटे काढले. एक तर ग्रामस्थांच्या स्थानिक पातळीवर सोडवल्या जाऊ शकणाऱ्या तक्रारींवर अजित पवारांनी डोक्यावर हात मारून घेतला.
अजित पवारांनी सावध रहावं अन्यथा…., छगन भुजबळांचं नाव घेत जरांगे पाटील असं का म्हणाले?
ग्रामपंचायतकडून विरोधकांची अडवणूक केली जाते. अशी तक्रार केली गेली असता अजित पवार म्हणाले की, त्यांना निवडून तुम्ही दिले. माझं काम विकास कामांना पैसे देणं हे आहे. गावातील वाद थोरामोठ्यांनी चर्चेने सोडवायचे असतात. मी कुणाला निवडून देण्यासाठी बटन दाबायला सांगितलं होतं का? पवारांच्या बोलण्यावरून उपस्थितांमध्ये हशा पिकला.
तसेच रस्त्यावरील डिव्हायडर, कुत्री, अशा प्रश्नांवर बोलताना अजित पवार म्हणाले की, मी कुत्र्यांना सांगतो उडी मारू नका,असं मिश्किलपणे म्हणाले तर एका फलटणला पदरात घ्या म्हटल्यानंतर त्या ते म्हणाले माझा पदर फाटलाय असं म्हणत त्यांनी विकासकामांकडे लक्ष देण्याचं अश्वासन दिलं. त्यामुळे या भाषणामध्ये चांगलीच फटकेबाजी पाहायला मिळाली.