Nitesh Rane on Sanjay Raut : देशाच्या 75 वर्षांच्या संसदीय परंपरेचा अविभाज्य भाग असलेले जुने संसद भवन मंगळवारी (19 सप्टेंबर) इतिहासजमा झालं. गणेश चतुर्थीच्या दिवशी संसदेचे कामकाज नवीन संसद भवनात (new Parliament House) सुरू झालं. त्यानंतर नवीन संसदेत पहिल्यांदा महिला आरक्षण विधेयक (Women’s Reservation Bill) पास झालं. दरम्यान, या सगळ्या घडामोडींवरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी (Sanjay Raut)भाजपवर जोरदार टीका केली. नवीन संसद भवन एखाद्या बॅंकेट हॉलसारखं वाटतं, अशी टीका त्यांनी केली. त्यांनी केलेल्या या टीकेला आता भाजप आमदार नितेश राणेंनी (Nitesh Rane) जोरदार पलटवार केला.
ननीन संसद भवनाविषयी बोलतांना राऊत म्हणाले होते की, नवीन संसद भवनामध्ये गोंधळाशिवाय काहीच नाही. सर्वांची इच्छा आहे की, आम्हाला जुन्या संसद भवनात जाऊ द्या. नव्या संसद भवनात गुदमरल्यासारखं वाटतं. हे नवीन संसद भवन बॅंकेट हॉलसारखं वाटतं. त्यांच्या या विधनाची चांगलीच चर्चा रंगली आहे. यावर बोलतांना राणे म्हणाले की, संजय राजाराम राऊत म्हणतात की, नवीन संसद भवनापेक्षा जुनचं संसद भवन चांगलं आहे. मोदींना कशाला नवीन संसदभवन बांधलं? आज राऊत जे काही बोलतात, अशीच भावना तमान शिवसेनिकांची होती. ज्या मातोश्रीमध्ये बाळासाहेब ठाकरे राहत होते. त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य मातोश्रीवर काढलं.. ती मातोश्री सोडून उद्धव ठाकरेंना नवीन मातोश्री २ बांधायची काय गरज होती? त्यासाठी मुंबईला का लुटलं? असा सवाल राणेंनी केला. नवीन मातोश्रीवर सामान्य शिवसैनिकांना येण्याची देखील परवानगी नाही, असंही राणे म्हणाले.
Parineeti Raghav Wedding: परिणीती राघवच्या लग्नासाठी चोख बंदोबस्त; पाहुण्यांसाठी फोनवर…
काल ऐतिहासिक निर्णय घेत महिला आरक्षणाचे विधेयक लोकसभेत आणि राज्यसभेत बहुतमाने मंजूर झालं. यावरून राऊतांनाी भाजपवर निशाणा साधला होता. महिला विधेयक हे चुनावी जुमला आहे. काही प्रमुख पुरूष नेते निवडून न येण्यासाठी हे विधेयक आणलं. आणि विधेयक आणून काय मोठं केलं? असं वक्तव्य त्यांनी केलं होत. यावरही राणेंनी भाष्य केलं. ते म्हणाले, महिला विधेयक पारित झालं आणि राऊच म्हणतात काय मोठं झालं. महिला विधेयकचं तर पारित केलं. त्यांच्याकडून हेच उत्तर अपेक्षितच होतं. राऊत हे वैयक्तिक आयुष्यात चित्रपटातल्या शक्ती कपूर यांच्यासारखा रोल करतात, त्यांनी एका डॉक्टर महिलेचं आयुष्य बरबाद केलं. ते महिलांशी कसं बोलतं हे त्यांच्या व्हायरल रेकॉर्डिंगमुळं लोकांना कळलं. त्यामुळं राऊतांना महिला विधेयक मोठं वाटणार नाही. आमच्या बहिणी संसदेत येतील तेव्हा संजय राऊत आणि आदित्य ठाकरेंसारख्या शक्तीकपूरला जेलमध्ये जावं लागेल, असा इशाराही राणेंनी दिला.