Download App

‘कुठल्या देशातले, शहरातले लोक राऊतांना पप्पा बोलतात, याची यादी…’; नितेश राणेंचा इशारा

  • Written By: Last Updated:

Nitesh Rane On Sanjay Raut : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याप्रकरणी ठाकरे गटाचे नेते दत्ता दळवी यांना पोलिसांनी त्यांच्या राहत्या घरातून अटक केली आहे. या अटकेनंतर ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांचा जोरदार समाचार घेतला. राणेंचा उल्लेख नारायण तातू असा केला. इतकंच नाही तर त्यांना दोन नेपाळी मुलं आहेत, अशा शब्दात राऊतांनी टीकास्त्र डागलं. या टीकेनंतर आता आमदार नितेश राणेंनी (Nitesh Rane) राऊतांवर जोरदार पलटवार केला.

Government Schemes : पोकरा अंतर्गत गांडूळ खत/नाडेप/सेंद्रिय निविष्ठा उत्पादन यूनिट अनुदान योजना 

नितेश राणे यांनी राऊतांवर टीका करतांना म्हटलं की, राणेंची मुलं काय आहे? हे महाराष्ट्राची जनता चांगल्या पद्धतीने ओळखते. पण संजय राऊत यांचं नाव लावून कोण कोण कुठे कुठे फिरतं? हे आम्हाला सांगायला लावू नका. कुठल्या देशातले, जातीतले, शहरातले लोक संजय राऊत यांना पप्पा बोलतात, याची यादी आम्हाला जाहीर करावी लागेल. तीही फोटो आणि व्हिडिओ सकट. मग तेव्हा तोंड फुगवून बसू नका, असा इशारा नितेश राणेंनी दिला.

‘2014 मध्ये पृथ्वीराज चव्हाणांनीच सरकार घालवलं’; पटेल-तटकरेंनंतर विखेंनी घेरलं 

नारायण राणे काय म्हणाले?
शिवसेनेचे 16 चे 160 आमदार होतील, असं विधान आदित्य ठाकरे यांनी केलं होतं.. त्यांच्या वक्तव्याची केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी समाजार घेतला. डिसेंबर नंतर ते बैठका घेण्यासाठीही येणार नाहीत. काही दिवसांनंतर ते जेलमध्ये जाणणार आहेत. सोबत संजय राऊतही असतील, अशा इशारा राणेंनी दिला होता.

राऊतांची टीका-
काही दिवसांपूर्वी नारायण तातू राणे येथे आले होते. माझ्याविरोधात शिवीगाळ केली. गुन्हा दाखल केला का? अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळेंना अत्यंत घाणेरडे शब्द वापरले. खटला दाखल केला? मंत्रीअसल्याने कारवाई होत नाही का? भाजप आणि गद्दार गटाचे नेते शिव्या देतात, अपशब्द वापरतात. पण, त्यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही. त्यांना अटक होत नाही. मात्र दत्ता दळवी यांनी जनभावना व्यक्त केल्या. तर त्यांना अटक केली. नारायण तातू राणे आणि त्यांची दोन नेपाळी मुलं खुलेआम शिव्या देतात, कोणत्याही भाषेचा वारप करतात. त्यांच्यावर कारवाई नाही. मात्र, आमच्या कार्यकर्त्यावर कारवाई केली जाते. तुम्ही कितीही जुलूम करा, २०२४ मध्ये तुरुंगात जाल, असे संजय राऊत म्हणाले.

दरम्यान, नितेश राणेंनी केलेल्या टीकेला आता संजय राऊत काय प्रत्युत्तर देतात, हेच पाहणं महत्वाचं आहे.

Tags

follow us