Maratha Reservation : हल्ला अन् धमकीचं समर्थन..,; आमदार लाड यांना धमकीचा फोन, जरांगे पाटील काय म्हणाले?

आमदार प्रसाद लाड धमकी प्रकरणी मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे यांनी माध्यमांसमोर आपली भूमिका स्पष्ट केलीयं.

Untitle (36)

Untitle (36)

Manoj Jarnage On Mla Prasad Lad : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्द्यावर मनोज जरांगे यांनी आंदोलनाची हाक दिल्यानंतर भाजपचे आमदार प्रसाद लाड (Prasad Lad) आज मनोज जरांगे यांची अंतरवलीत भेट घेणार आहेत. या भेटीसाठी आमदार लाड छत्रपती संभाजीनगरच्या हॉटेलमध्ये आलेले असतानाच काल रात्रीच्या सुमारास त्यांच्या पीएला धमकीचा फोन आल्याची माहिती समोर आलीयं. एवढंच नाही तर दोन जणांनी हॉटेलमध्ये शिरण्याचाही प्रयत्न केल्याचं समोर आलंय. या धमकीप्रकरणावर मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे यांनी आपली भूमिका स्पष्ट केलीयं. आमदार लाड यांच्यावरील हल्ला आणि धमकीचं समर्थन होऊच शकत नाही, असं मनोज जरांगे यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलंय.

Heat Wave : नागरिकांनो घरबाहेर पडणे टाळा! अमरावती, अकोला, वर्ध्यात ऑरेंज अलर्ट

पुढे बोलताना मनोज जरांगे म्हणाले, आमदार प्रसाद लाड कोणाला काही बोललेले नाहीत . तुम्ही कसं काय धमकी देत आहात? मराठा समाजाला गालबोट लागेल असं कुणी वागू नये. हल्ला, धमकीचं समर्थन होऊ शकत नाही. धमकी देणाऱ्यासंदर्भात मला काही माहिती नाही. आमदार प्रसाद लाड आधी मराठा समाजाविरोधात बोलत होते. आता ते मराठा समाजाच्याबाजूने बोलत आहेत, असं मनोज जरांगे यांनी स्पष्ट केलंय.

तसेच मुख्यमंत्र्यांना विचारल्याशिवाय मी कुठेही जाऊ शकत, असं आमदार लाड यांनी सांगितलं. जो मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन आलायं ते मुख्यमंत्र्यांचं शिष्टमंडळ नाही का?
एकाच असो वा दोघांचं असो ते मुख्यमंत्र्यांचं शिष्टमंडळ आहे. मुख्यमंत्र्यांचं शिष्टमंडळ नसेल तर नसुद्या पण आरक्षण द्या. लाड हे मुख्यमंत्र्यांच्या जवळचे आहेत पण मराठ्यांच्याही जवळचे आहेत. ते समाजाच्याविरोधात बोलत होते त्यांचा माझा काही वाद नाही. ते समाजाविरोधात बोलले होते आज ते समाजाच्या बाजूने बोलले, त्यांनाही समाजाच्या लेकरांचं कल्याण करायचंय. त्यांच्या आमचा विश्वास असल्याचंही मनोज जरांगे यांनी स्पष्ट केलंय.

आमदार लाड यांना धमकीचा फोन…

मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी आलेल्या भाजप आमदार प्रसाद लाड यांना छत्रपती संभाजीनगरमधील दोघांनी फोनवरून धमकी दिली. याआधी मनोज जरंगे पाटील यांचे आंदोलन सुरू होते, त्यावेळेस मनोज जरांगे यांच्यावर टीका केली आणि आता तुम्ही भेटायला कशाला येत आहात? असा प्रश्न उपस्थित केला. तुम्ही जर इथे भेटायला आले तर आम्ही तुमच्यावर हल्ला करू अशी धमकी प्रसाद लाड यांना दिली. याप्रकरणी दोघांना पोलिसांनी अटक केलेली आहे. गणेश उगले पाटील, योगेश शितोळे पाटील अशी त्यांची नावे आहेत. या दोघांना सिडको परिसरातून अटक केली.

Exit mobile version