Neet Exam Paper Leak : बालरोगतज्ज्ञ मनोज शिरुरेच्या घरी सीबीआयची धाड…काय-काय सापडलं?
नीट पेपरफुटी प्रकरणी डॉ. मनोज शिरुरे यांच्या संदर्भातील तपास अधिक तीव्र झाला असून सीबीआयच्या पथकाने त्यांच्या निवासस्थानी पुन्हा धाड टाकली
Neet Exam Paper Leak : नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणात अटकेत असलेल्या डॉ. मनोज शिरुरेच्या लातूरच्या घरी सीबीआयने धाड टाकल्याची माहिती समोर आलीयं. काल सकाळी लातूरमध्ये प्राथमिक तपासणी केल्यानंतर सीबीआयचे पथक थेट अंबाजोगाईकडे रवाना झाले आहे.
अंबाजोगाईमध्ये विद्यार्थी आणि पालकांची चौकशी करण्यात आली. चौकशीत अनेक धागेदोरे मिळाल्याचं समोर येत आहे. त्यानंतर पथकाने शिरुरे यांच्या हॉस्पिटलच्या बाजूलाच असलेल्या एका अपार्टमेंमध्ये अधिकाऱ्यांनी सखोल चौकशी केली. या चौकशीदरम्यान, काही महत्वाची कागदपत्र सापडल्याचं समोर आलंय. हे साहित्य सीबीआयने पुढील तपासासाठी ताब्यात घेतलंय.
Hamza Burhan : पुलवामा हल्ल्याचा सूत्रधार ठार; दहशतवादी हमजा बुरहानची गोळ्या घालून हत्या
दिवसभरातील तपासातून मिळालेल्या माहितीनंतर सीबीआयचे पथक पुन्हा डॉ. शिरुरे यांच्या निवासस्थानी पोहोचले. नव्या लीडच्या आधारे आणखी काही पुरावे किंवा कागदपत्रे मिळतात का, याचा शोध अधिकारी घेत असल्याची माहिती आहे. नीट पेपरफुटी प्रकरणातील तपास आता अधिक व्यापक होत असून मराठवाड्यातील विविध शहरांमध्ये चौकशीचे सत्र सुरू असल्याने या प्रकरणातील नेटवर्क किती मोठे आहे, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
तुमचं भविष्य उद्ध्वस्त केल्याने भाजपला अनफॉलो करा; कॉकरोच पार्टीचे संस्थापक भाजपवर भडकले
नीट परीक्षा फुटी प्रकरणी सीबीआयने आरसीसी कोचिंग क्लासचे प्राध्यपक पी.व्ही कुलकर्णी आणि मॉर्डन कॉलेजच्या प्राध्यापिका मनिषा मांढरे हिला अटक केल्यानंतर आरसीसी कोचिंग क्लासेसचे संचालक शिवराज मोटेगावकरांचं नाव समोर आलं. त्यानंतर सीबीआयने सुरुवातीला मोटेगावकरची लातूरला जात साधी चौकशी केली. चौकशी केल्यानंतर मोटेगावकरचा मोबाईल फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आला. यामध्ये डिलिट केलेला डेटा रिकव्हर केल्यानंतर मोबाईलमधील प्रश्न आणि नीट परीक्षेतील प्रश्न अगदी तंतोतंत जुळले.