तुमचं भविष्य उद्ध्वस्त केल्याने भाजपला अनफॉलो करा; कॉकरोच पार्टीचे संस्थापक भाजपवर भडकले

Cockroach Janata Party :  भारतीय सोशल मीडियावर सध्या कॉकरोच जनता पार्टीची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. अवघ्या चार दिवसांपूर्वी

Cockroach Janata Party
Cockroach Janata Party :  भारतीय सोशल मीडियावर सध्या कॉकरोच जनता पार्टीची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. अवघ्या चार दिवसांपूर्वी आलेल्या या पक्षाने इन्स्टाग्रामवर फॉलोअर्सच्या बाबतीत सत्ताधारी भाजपला देखील मागे टाकले आहे. या पक्षाचे अवघ्या चार दिवसात जवळपास 11 दशलक्ष फॉलोअर्स झाले असून यांची संख्या देखील झपाट्याने वाढत आहे. इन्स्टाग्रामवर भाजपच्या फॉलोअर्सची संख्या जवळपास 8 दशलक्ष आहे. तर दुसरीकडे आता कॉकरोच पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी फॉलोअर्सला भाजपच्या फॉलोअर्सची संख्या कमी करण्याचे आवाहन केले आहे. तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त करणाऱ्या सत्ताधारी भाजपचे फॉओअर्सची संख्या कमी करण्याचे आवाहन एका लाईव्हमध्ये कॉकरोच पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी केलं आहे.
या लाईव्हमध्ये अभिजीत दीपके (Abhijeet Dipke) म्हणाले की, आमचे फॉलोअर्स आता भाजपपेक्षा जास्त झाले आहे. भाजपला 8 दशलक्ष फॉलोअर्ससाठी 40 वर्षे लागली होती. यासाठी त्यांनी किती कोटी रुपये खर्च केले आहे. तर आता आपलं पुढचं टार्गेट आहे भाजपचे (BJP) फॉलोअर्स कमी करायचे. या लोकांनी तुमचं भविष्य उद्ध्वस्त केलं आहे. त्यामुळे आता प्रत्येकाने भाजपला अनफॉलो करा आणि ब्लॉक करा. भाजप जर शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घेत नसेल, नीट प्रकरणात कारवाई करत नसेल, तरुणांना नोकरी देत नसेल तर भाजपला अनफॉलो करा असं आवाहन कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दीपकेनं केलं आहे. अभिजित दीपके यांनी केलेल्या या आवाहनानंतर इन्स्टाग्रामवर (Instagram) भाजपच्या फॉलोअर्सच्या संख्येत घट होते का? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

नेमकं प्रकरण काय?

भारताचे चीफ जस्टिस ऑफ इंडिया सूर्यकांत (CJI Surya Kant) यांनी एका प्रकरणात सुनावाई करताना देशातील तरुणांची तुलना कॉकरेच आणि परजीवी म्हणजेच इतरांवर जगणारे जीव यांच्याशी केली होती. यानंतर सोशल मीडियावर  अभिजीत दीपके यांनी कॉकरोच जनता पार्टीची स्थापना केली असून सध्या तरुणांकडून या पक्षाला सोशल मीडियावर जोरदार पाठिंबा मिळताना दिसत आहे. पक्षाच्या इन्स्टाग्राम हँडलने 90 लाखांहून अधिक फॉलोअर्स मिळवले आहेत आणि ही संख्या सातत्याने वाढतच आहे. तर भाजपचा विचार करता, या पक्षाचे सध्या इन्स्टाग्रामवर 87 लाख (8.7 दशलक्ष) फॉलोअर्स आहेत, तर काँग्रेस पक्षाचे 1.32 कोटी (13.2 दशलक्ष) फॉलोअर्स आहेत.

पक्षाचे सदस्यत्व मिळवण्यासाठी पात्रता निकष काय आहेत?

पहिला: बेरोजगारी.
दुसरा: आळशीपणा—म्हणजेच, केवळ निवांत बसून राहण्याची किंवा रिकामटेकडे पडून राहण्याची तयारी असणे
तिसरा: सतत ‘ऑनलाइन’ राहण्याचे व्यसन असणे.
चौथा: आपली नाराजी किंवा संताप “व्यावसायिक” पद्धतीने व्यक्त करण्याची क्षमता असणे.

follow us