Download App

अजितदादांना सोबत ठेवायचं की नाही पक्ष ठरवेल, आमदार कुल यांचं विधान

कार्यकर्त्यांच्या भावनांचा पक्ष आदर करेल. जो अवहाल येईल, त्यावर पक्ष योग्य निर्णय घेईल. अजितदादांना सोबत घ्यायचं की नाही पक्षच ठरवेल. - कुल

  • Written By: Last Updated:

Rahul Kul On Ajit Pawar : लोकसभा निवडणुकीनंतर महायुतीमध्ये (Mahayuti) धुसफूस सुरू असल्याच्या चर्चा आहेत. विशेषत: अजित पवारांवर (Ajit Pawar) महायुतीमधील पक्ष नाराज असल्याचं बोलल्या जात आहे. अशातच काल भाजपचे पदाधिकारी सुदर्शन चौधरी (Sudarshan Chaudhari) यांनी अजित पवार सत्तेत असतील तर आम्हाला विधानसभेची सत्ता नको, अजित दादांना महायुतीतून बाहेर काढा, अशा शब्दात आपली खदखद बोलून दाखवली. त्यावर आता आमदार राहुल कुल (Rahul Kul) यांनी भाष्य केलं.

Shashikant Shinde राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष होणार? शिंदेंनी सांगून टाकलं… 

आज लेट्सअप मराठीशी आमदार राहुल कुल यांनी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. यावेळी त्यांना सुदर्शन चौधरी यांच्या व्हायरल क्लिप विषयी विचारले असता कुल म्हणाले, मी एवढचं सांगेन की, कालची व्हायरल झालेली व्हिडिओ क्लिप ही अंतर्गत बैठतीतील विषय होता. ती क्लिप बाहेर येणं अपेक्षित नव्हतं. या बैठकीला निरिक्षक सुभाष देशमुख हजर होते. आता ते सर्व बाबींचा विचार करून अहवाल सादर करून प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंकडे देतील, त्यावर पक्ष योग्य निर्णय घेईल, असं कुल म्हणाले.

पुणे विमानतळाच्या कामांना गती; केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या प्रयत्नांना मोठे यश 

‘तो’ निर्णय पक्ष घेईल…
अजित पवारांविषयी कार्यकर्त्यांच्या मनात असलेली नाराजी आपण वरिष्ठांना कळवणार का? या प्रश्नांवर बोलताना कुल म्हणाले, तीन तासाच्या बैठकीत अनेक विषयांवर चर्चा झाली. अनेक भावना आणि मते कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. जी क्लिप व्हायलर झाली, ती त्या बैठकीतील छोटीसा भाग होता. कार्यकर्त्यांच्या भावनांचा पक्ष आदर करत असतो. पण, जो काही अवहाल समोर येईल, त्यावर पक्ष योग्य निर्णय घेईल, पक्षाचा निर्णय अंतिम असेल. अजितदादांना सोबत घ्यायचं की नाही पक्षच ठरवेल, असं कुल म्हणाले.

काय म्हणाले चौधरी?
दौंडमध्ये भाजप कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. या बैठकीत अजित पवारांविरोधी भाजप कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली.खरचं कार्यकर्ते काय सांगतात, याचा विचार करणार असाल तर अजितदादांना महायुतीमधून बाहेर काढा. त्यांनी सुभाषबापू, योगेशअण्णा, राहुलदादांवर अन्याय केला. हे तिघेही नेते मंत्री झाले असते. अनेक लोकांना महामंडळ मिळाले असते. पण, आम्ही ज्यांना 10 वर्ष विरोध केला, तीच राष्ट्रवादी आमच्या बोकांडी बसवली. अशी सत्ता आम्हाला नको, अशी खदखद चौधरी यांनी बोलून दाखवली.

follow us