Download App

आमदार राम शिंदेंनी विखे पिता-पुत्रांवर डागली तोफ ! थेट पक्षश्रेष्ठींकडे तक्रार

  • Written By: Last Updated:

Ram Shinde Vs Vikhe: नगरमध्ये भाजपचे मूळ नेते व महसूल मंत्री राधाकृष्ण विखे, खासदार सुजय विखे यांच्यात मोठे मतभेद असल्याचे पुन्हा एकदा उघडकीस आले आहे. जामखेड बाजार समितीच्या राजकारणाच्या अडून आमदार राम शिंदे यांनी पुन्हा विखे पिता-पुत्रांवर तोफ डागत गंभीर आरोप केले आहेत. विखे यांची पक्षश्रेष्ठींकडेही आमदार राम शिंदे यांनी तक्रार केली आहे.

मविआच्या बैठकीत मी होतो पण… जितेंद्र आव्हाडांचं उत्तर

जामखेड बाजार समितीच्या सभापती व उपसभापतींची निवड आज झाली. त्यात ईश्वरचिठ्ठीने शिंदे गटाचे शरद कार्ले हे सभापती झाले. तर आमदार रोहित पवार यांच्या गटाचा ईश्वरचिठ्ठीने उपसभापती झाला. त्यानंतर माध्यमांशी बोलताना आमदार राम शिंदे यांनी विखे पिता-पुत्रांवर गंभीर आरोप केले आहेत. विखेंनी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांना छुपा पाठिंबा दिल्याचा आरोप शिंदे यांचा आहे.

शिंदे म्हणाले, उपसभापतीपदाला सचिन घुमरे यांचा पराभव झाला असला तरी सभापती आमचा झाला आहे. त्यामुळे ही बाजार समिती आमच्या ताब्यात आली आहे. खासदार सुजय विखे, पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी यांचे सहकार्य अपेक्षित होते. पण ते मिळाले नाही. विखेंचे पीए आणि त्यांच्या बंधूंनी विरोधात फॉर्म भरला. विखेंनी एक कार्यकर्ता विरोधात उभा केल्याचा आरोप राम शिंदे यांनी केला आहे.

ईश्वर चिठ्ठी राम शिंदेंना पावली ! जामखेडमध्ये भाजपचा सभापती, राष्ट्रवादीचा उपसभापती

आम्ही त्यांना उमेदवारी देतो असे सांगितले होते. पण सुरुवातीला आणि नंतर आम्हाला मदत झाली नाही. उलटविरोधात उपसभापतीचा फॉर्म भरला आहे. आम्ही पवारांच्या विरोधात लढत असताना खासदार विखे आमच्या विरोधात लढत आहे. भारतीय जनता पक्षाने विखेंना खासदार, पालकमंत्री पद दिले. दोन नंबरचे महसूल खाते दिले आहे. त्यानंतर कार्यकर्त्यांच्या निवडणुकीत ते चुकीचे वागले आहे. तो गंभीर विषय आहे.

माझ्या आमदारकीच्या वेळेस तेच केले. कुठेतरी पॅचअप होईल, असे वाटत होते. पण ते झाले नाही. विखेंचे वर्तन चुकीचे आहे. त्याबाबत पक्षश्रेष्ठींकडे तक्रार केली असल्याचे राम शिंदे यांनी म्हटले आहे.

गेल्या महिन्यात राम शिंदे यांनी अहमदनगर मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढविण्यास इच्छूक असल्याचे सांगितले होते. आता थेट विखे पिता-पुत्रांवर राम शिंदे यांनी गंभीर आरोप केले आहेत.

Tags

follow us