मविआच्या बैठकीत मी होतो पण… जितेंद्र आव्हाडांचं उत्तर

मविआच्या बैठकीत मी होतो पण… जितेंद्र आव्हाडांचं उत्तर

कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीनंतर आता महाराष्ट्रातही निवडणुकीसाठी विरोधी पक्षांकडून जोरदार तयारी सुरु केल्याचं दिसून येतं आहे. कर्नाटक निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी तत्काळ महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक बोलवली होती. या बैठकीत आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्वपूर्ण चर्चा झाल्याचं बोललं जातंय.

सातारा जिल्ह्यात होणार पोलीस प्रशिक्षण केंद्र; मुख्यमंत्र्यांकडून मान्यता

कर्नाटकात कोणत्या पक्षाचं पारडं जड असणार हे आता स्पष्ट झालं. या निवडणुकीत भाजपच्या धुव्वा उडवत काँग्रेसने 135 जागांवर दणदणीत विजय मिळवला आहे. त्यानंतर लगेचच महाराष्ट्रात आता विरोधी पक्षांकडून भाजपल्या पराभूत करण्यासाठी मोट बांधण्याचं काम सुरु असल्याचं दिसून येत आहे.

सिल्वर ओकवर झालेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीला ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे प्रमुख नेते उपस्थित होते. या बैठकीत आगामी निवडणुकीची रणनीती आखण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. तसेच महाविकास आघाडीतील प्रमुख पक्षांसह मित्र पक्षांनाही सोबत घेण्यात येणार असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली आहे.

कोर्टाच्या आवारातच शूटआऊट; २ आरोपींवर अंदाधुंद गोळीबार

त्याचप्रमाणे जागावाटपाबाबतही प्राथमिक स्वरुपाची चर्चा झाल्याचं बोललं जातंय. अशातच आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी आणि ठाकरे गटासह तिन्ही पक्षांना 16 जागांचा फॉर्मुला ठरला असल्याचीही दबक्या आवाजात चर्चा सुरु आहे.दरम्यान, अद्याप जागाबाटपाबाबत कोणीही दुजोरा नसून राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी जागावाटपाबाबत स्पष्ट बोलले आहेत.

द्वेष पसरवणाऱ्या समाजकंटकावर कठोर कारवाई करणार, मुख्यमंत्र्यांचा इशारा

महाविकास आघाडीमध्ये 16 जागांचा फॉर्मुला ठरला असल्याचा थेट प्रश्न विचारण्यात आल्यानंतर जितेंद्र आव्हांड म्हणाले, “महाविकास आघीडीच्या बैठकीला मी होता, पण मला काही माहित नाही बैठकीत मी आंधळा मुका बहिरा होतो”, असं उत्तर देत जागावाटपावर बोलणं टाळलं आहे. महाविकास आघाडीच्या बैठकीनंतर अद्याप एकाही नेत्याने जागावाटपाबाबत स्पष्टीकरण दिलं नसून बैठकीत चर्चा झालीय पण ती गुलदस्त्यातच आहे.

दरम्यान, जागावाटपाबाबत ठरलेल्या फॉर्मुल्यावर अद्याप तरी एकाही पक्षाच्या नेत्याने भूमिका स्पष्ट केली नसून आगामी निवडणुकामध्ये तिन्ही पक्ष एकत्रच लढणार का? अशा चर्चांना उधाण आलं आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube