द्वेष पसरवणाऱ्या समाजकंटकावर कठोर कारवाई करणार, मुख्यमंत्र्यांचा इशारा

द्वेष पसरवणाऱ्या समाजकंटकावर कठोर कारवाई करणार, मुख्यमंत्र्यांचा इशारा

Eknath Shinde on Maharashtra violence : महाराष्ट्रात सर्व धर्मीय लोक हे गुण्यागोंविदाने राहतात. कुणीही जातीय तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न करु नये. कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करु नये. सरकार सर्व धर्मीय लोकांना पुढं घेऊन जात आहे पण काही समाजकंटक जातीय तणाव आणि द्वेष पसरवण्याचे काम जाणीवपूर्वक करत असतील तर अशा लोकांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला.

राज्यात कायदा सुवस्था राखली गेली पाहिजे. त्यामध्ये सर्वांनी सहकार्य केलं पाहिजे, असे आवाहन मुख्यमंत्री केलं आहे. शेवगाव आणि अकोला शहरात झालेल्या हिंसाचाराचे व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. यावर असे व्हिडीओ व्हायरल करु नये असे अवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं होतं.

मोठी बातमी : पुण्यात अतिक्रमण कारवाईदरम्यान जमावाची पालिकेच्या कर्मचाऱ्याला जबर मारहाण

पंढरपूर आषाढी एकादशीनिमित्त एसटी प्रवासात महिलांना 50 टक्के सवलत देण्यात आली आहे. तसेच ज्येष्ठ नागरिकांना देखील सवलत देण्यात आली आहे. त्यामुळे एसटीच्या प्रवाशांच्या संख्येत वाढ झाली आहे. वारकऱ्यांची कुठेही गैरसोय होऊ नये, अशा सुचना काल झालेल्या बैठकीत देण्यात आल्या आहेत. पाच हजार एसटी बस सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

मद्यपान करून गाडी चालवाणे व नियम न पाळणार्यांवर कारवाईचे आदेश दिलेले आहेत. मद्यपान करून गाडी चालवणे व इतर नियमांचे उल्लघंन करणार्यांमुळे मोठ्या प्रमाणात अपघात व मृत्यू वाढायचे अशा अपघातांना रोख बसावी. यासाठी कठोर कारवाईचे आदेश दिले, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

कोणताही दबाव नाही, निर्णय संविधानिक तरतुदींच्या आधारेच होणार, नार्वेकरांनी ठणकावून सांगितलं

अवकाळी पाऊस आणि गारपीटीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना एनडीआरएफपेक्षा दुप्पट मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. दोन हेक्टरवरुन तीन हेक्टरची मर्यादा वाढवण्याचा निर्णय यापूर्वीच घेण्यात आला आहे. सततच्या पावसाने होणारे नुकसान नैसर्गिक आपत्तीमध्ये धरले जात नव्हते तो देखील निर्णय आम्ही बदलला आहे. त्यात काही अडचणी होत्या त्या देखील सरकारने दूर केला आहे. नियमीत कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये अनुदान देण्याची अंमलबजाणी सरकारने केली आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube