मोठी बातमी : पुण्यात अतिक्रमण कारवाईदरम्यान जमावाची पालिकेच्या कर्मचाऱ्याला जबर मारहाण

  • Written By: Published:
Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 05 16T143545.251

Pune Street Vendors: पुण्यातून एक धक्कादायक आणि मोठी बातमी समोर आली आहे. अतिक्रमणावर कारवाईसाठी गेलेल्या महापालिकेच्या सुरक्षा रक्षकाला जमावाने जबर मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ढोले पाटील क्षेत्रीय कार्यालय परिसरात हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रस्त्यावरील अनाधिकृत फेरीवाले यांच्याविरुद्ध कारवाई सुरू असताना ही मारहाण करण्यात आली आहे.

या घटनेचा व्हिडिओदेखील समोर आला आहे. पुण्यामध्ये अतिक्रमण विरोधी कारवाई सुरु असताना पालिकेच्या सुरक्षारक्षकावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. फेरीवाल्यांकडून पालिकेच्या सुरक्षारक्षकाला चांगलाच चोप दिला आहे. पुण्यातील क्षेत्रीय कार्यालयाच्या अंतर्गत अतिक्रमण विभाग आज सकाळपासून कारवाईला सुरुवात केली आहे.

मुलींच्या ओरडण्याचा आवाज ऐकला अन् 53 वर्षीय संजय माताळेंनी थेट धरणात उडी घेतली

फेरीवाल्यांकडून सुरक्षारक्षकाला जोरदार मारहाण केली आहे. अनाधिकृत फेरीवाल्यांविरोधामध्ये कारवाई केली जात असताना त्यांनी सुरक्षा कर्मचाऱ्यावर हात उगारला. ही सर्व घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या व्हिडीओमध्ये काही तरुण सुरक्षा कर्मचाऱ्यावर हल्ला करताना दिसून आले आहेत. यावेळी दोघा-तिघांनी त्याला पकडलेला असून बुक्क्या मारत होते.

तसेच एकाने तर हातातील बकेट देखील कर्मचाऱ्याच्या डोक्यात घातला आहे. तसेच एक तरुण मात्र हे भांडण थांबवण्याचा प्रयत्न करत होता. तो सुरक्षा कर्मचाऱ्याला लांब नेण्याचा प्रयत्न करत असताना काही तरुण पुन्हा त्याच्या अंगावर जाण्याचा प्रयत्न करत होते.

Tags

follow us