भाजप नेत्यांची महिलांविषयीची भाषा वेशीवर टांगणारी…कथित ऑडिओ क्लिप शेअर करीत रोहित पवारांचा निशाणा

नंदुरबारमध्ये व्हायरल होत असलेली कथित ऑडिओ क्लिप शेअर करीत आमदार रोहित पवार यांनी भाजपच्या नेत्यांवर टीकेची तोफ डागलीयं.

Rohit pawar

Rohit pawar

Rohit Pawar On BJP Leader : नंदूरबारच्या कथित ऑडिओ क्लिप प्रकरणात भाजपच्या माजी खासदार डॉ. हिना गावितविद्यार्थ्यांवर गोळीबाराचे आदेश अमित शाहांचे…फडणवीसांचा राहुल गांधींना खोचक सवाल (Hina Gavit) यांना शिवीगाळ केल्याचं समोर आलं. या प्रकरणात भाजपचे माजी प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांच्यावर नंदुरबार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. त्यानंतर आता राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी ही कथित ऑडिओ क्लिप आपल्या फेसबुक अकाऊंटवर शेअर करीत भाजपच्या नेत्यांचे महिलांविषयीची भाषा ही वेशीवर टांगणार असल्याच म्हणत निशाणा साधला आहे.

आमदार रोहित पवार यांनी कथिक ऑडिओ शेअर करत भाजपच्या भाषा संस्कृतीवरुन प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. या क्लिपमधील चर्चेनुसार आपल्याच पक्षाच्या एका माजी खासदार राहिलेल्या महिलेबाबत भाजपचे लोक किती ‘सुसंस्कृत’ भाषा वापरतात हे स्पष्ट दिसतं. पुरोगामी महाराष्ट्रात लाडकी बहिण असलेल्या आपल्याच पक्षाच्या एका महिलेबाबतची ही भाषा भाजपाची लाज वेशीवर टांगणारी असून आपल्याच मित्र पक्षांच्या बाबतीत कटकारस्थान रचून त्यांना गिळंकृत करण्यात भाजप माहीर असल्याची टीकाही आमदार रोहित पवार यांनी केली आहे.

तसेच भाजपच्या माजी खासदाराच्या घरात असलेल्या पैशांचाही उल्लेख या ऑडिओ क्लिपमध्ये करण्यात आल्याचं ऐकायला मिळतंय. त्यावरुन रोहित पवार यांनी आता ईडी अधिकाऱ्यांनी विरोधकांवर होत असलेल्या कारवायांमधून थोडा वेळ काढून इकडेही लक्ष द्यावं, असा खोचक सल्लाही दिला आहे. आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर कथित ऑडिओ क्लिप शेअर करताना खान्देशातील भाजपचा कॅबिनेट मंत्री आणि भाजपचा माजी महामंत्री असल्याचाही उल्लेख केला आहे. पवार यांनी अप्रत्यक्षपणे भाजपचे मंत्री गिरीश महाजन आणि माजी महामंत्री विजय चौधरी यांच्यावर रोख धरला आहे.

राज्य सरकारचा मोठा निर्णय; कोयना जलसागर आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने ओळखला जाणार

नेमकं काय घडलं?
भाजपचे माजी प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांची मंत्री जयकुमार रावल, मंत्री गिरीश महाजन यांच्याबरोबरच्या संवादाच्या कथीत ध्वनिफितीही प्रसारित झाल्या असून त्यातून भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. या ध्वनिफितींमधून आमदार डाॅ. विजयकुमार गावित यांच्या कुटुंबाला लक्ष्य करण्यात येत असल्याचा आरोप केला जात आहे. त्यातही डॉ. हिना गावितांबाबत अत्यंत आक्षेपार्ह भाषा असलेली एक कथीत ध्वनिफित प्रसारित झाली आहे. त्यामुळे हिना गावितांचे चुलतभाऊ रोहन गावित यांच्या तक्रारीवरुन भाजपचे विजय चौधरी यांच्या विरोधात नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात जातीवाचक शिवीगाळ तसेच अन्य कायद्यातंर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, नंदुरबारमध्ये १५ दिवसांपासून भाजपचे माजी प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांच्याशी संबंधित कथित ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहेत. या सर्व कथित ऑडिओ क्लिप एआय तंत्रज्ञानाच्या मदतीने छेडछाड करुन प्रसारित केल्या जात असल्याचा दावा भाजपचे विजय चौधरी यांनी केला आहे.

Exit mobile version