स्वार्थी नेत्यांनी आपल्या उद्गात्याला निवडणूक आयोगाच्या दारात…; रोहित पवारांची टीका

Rohit Pawar on Ajit Pawar group : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) फूट पडल्यानंतर अजित पवार गटाने थेट पक्षावर आणि पक्ष चिन्हावरच दावा ठोकला आहे. हा वाद आता थेट केंद्रीय निवडणूक आयोगाकडे (Central Election Commission) पोहोचला आहे. यावर आज सुनावणी झाली. या सुनावणीला खुद्द पक्षाध्यक्ष शरद पवार हे उपस्थित होते. दरम्यान, यावरून आता राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार रोहित […]

Rohit Pawar : 'शेतकऱ्यांचा नाही, बड्या व्यापाऱ्यांचाच फायदा'; रोहित पवारांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

Rohit Pawar : 'शेतकऱ्यांचा नाही, बड्या व्यापाऱ्यांचाच फायदा'; रोहित पवारांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

Rohit Pawar on Ajit Pawar group : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) फूट पडल्यानंतर अजित पवार गटाने थेट पक्षावर आणि पक्ष चिन्हावरच दावा ठोकला आहे. हा वाद आता थेट केंद्रीय निवडणूक आयोगाकडे (Central Election Commission) पोहोचला आहे. यावर आज सुनावणी झाली. या सुनावणीला खुद्द पक्षाध्यक्ष शरद पवार हे उपस्थित होते. दरम्यान, यावरून आता राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी अजित पवार गटावर जोरदार निशाणा साधला. ज्यांना ताकद दिली, त्याच स्वार्थी नेत्यांनी आज आपल्या उद्गात्याला निवडणूक आयोगाच्या दारात उभं केलं, अशी जहरी टीका रोहित पवारांनी (Rohit Pawar) केली.

राष्ट्रवादीत फुट पडल्यानंतर त्यांचं हे प्रकरण केंद्रीय निवडणूक आयोगाकडे गेलं. आज राष्ट्रवादीच्या पक्ष चिन्हावर निवडणूक आयोगाने सुनावणी केली. ही सुनावणी दो तास चालली. अजित पवार गटाकडून ज्येष्ठ वकील मनिंदर सिंह यांनी युक्तीवाद केली. तर शरद पवार गटाने अभिषेक मनु सिंघवी यांनी युक्तीवाद केला.

या सगळ्या घडामोडींवरून रोहित पवारांनी ट्विट करत अजित पवार गटावर निशाणा साधला. त्यांनी लिहिलं की, ज्या माणसाने पक्षाला आणि पर्यायाने नेत्यांना उभं केलं, ताकद दिली, आज त्याच स्वार्थी नेत्यांनी आपल्या उद्गात्याला निवडणूक आयोगाच्या दारात उभं केलं. या स्वार्थी प्रवृत्तींनी आपला स्वाभिमान गहाण टाकला असला, अशी टीका त्यांनी केली.

रोहित पवारांनी पुढं लिहिलं की, स्वार्थी प्रवृत्तींनी आपला स्वाभिमान गहाण टाकला असला तरी सर्वसामान्य कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या ताकदीने आदरणीय पवार साहेबांसोबत आहेत आणि हीच साहेबांची खरी ताकद आहे. याच ताकदीच्या बळावर महाराष्ट्र धर्म आणि महाराष्ट्राचा विचार जपण्यासाठी हा सह्याद्री लढतोय आणि या लढाईत त्यांचा विजय होणारच!, असा विश्वास विश्वास त्यांनी व्यक्त केला.

अजित पवार गटाचा दावा
शरद पवार त्यांच्या मर्जीनुसार पक्ष चालवतात आणि त्यांची अध्यक्षपदाची निवड बेकायदेशीर असल्याचा मोठा दावा अजित पवार गटाने केला आहे. तर एक गट आम्हाला सोडून बाहेर पडला आहे. पण मुळ पक्ष आमचाच आहे. पक्षावरचा दावा आमचाच योग्य आहे. राष्ट्रवादीच्या वादावर निर्णय होईपर्यंत हे चिन्ह आमच्याकडेच द्या, ते गोठवू नका, अशी मागणी शरद पवार गटाने केली. पुढील सुनावणी 9 ऑक्टोबरला होणार आहे. त्या सुनावणीत काय होतं, हेच पाहणं महत्वाचं आहे.

Exit mobile version