Download App

‘जनतेला’ पोपट बनवलं जात आहे…पोपट प्रकरणात रोहित पवारांची एंट्री

MLA Rohit Pawar Speak : सध्या सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये पोपटावरून चांगलेच शाब्दिक युद्ध पेटले आहे. पोपट मेला असे वक्तव्य सत्ताधाऱ्यांकडून करण्यात येत आहे. त्याला विरोधकांकडून देखील प्रत्युत्तर दिले जात आहे. यातच आता या प्रकरणावर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी देखील भाष्य केले आहे. कोणाचा पोपट मेला हे निश्चितपणे सांगता येणार नाही. परंतु महाराष्ट्राच्या विकासाचा, युवकांच्या भविष्याचा, सर्वसामान्यांच्या स्वप्नांचा, आशा-आकांक्षांचा पोपट मेला हे मात्र निश्चितपणे खरं आहे. सद्याची राजकीय परिस्थिती बघता जनतेला पोपट बनवलं जात असल्याची भावना सर्वसामान्यांमध्ये दृढ होत आहे, अशी खरमरीत टीका रोहित पवार यांनी केली आहे.

रोहित पवार यांचे ट्विट नेमकं काय?
राजकीय वक्तव्ये करताना दोन्ही बाजूंनी पोपट मेल्याची वक्तव्ये करण्यात येत आहेत. कोणाचा पोपट_मेला हे निश्चितपणे सांगता येणार नाही. परंतु महाराष्ट्राच्या विकासाचा, युवकांच्या भविष्याचा, सर्वसामान्यांच्या स्वप्नांचा, आशा-आकांक्षांचा पोपट मेला हे मात्र निश्चितपणे खरं आहे. कुणावर टीका करायची नाही पण सद्याची राजकीय परिस्थिती बघता जनतेला पोपट बनवलं जात असल्याची भावना सर्वसामान्यांमध्ये दृढ होत आहे, हे मात्र नक्की! असं ट्विट करत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी ‘पोपट’ प्रकरणात एंट्री घेतली आहे.

पोपट प्रकरण नेमकं आहे तरी काय? जाणून घ्या
राज्याच्या राजकारणात सध्या पोपट प्रकरण हे चांगलेच गाजी लागले आहे. नेत्यांच्या भाषणात देखील याचा वारंवार उल्लेख केला जातो आहे. दरम्यान याची सुरुवात उद्धव ठाकरे यांच्याकडून झाली होती. राज्यातील सत्तासंघर्षाच्या निकालावर बोलताना ठाकरे म्हणाले, पोपट हलत नाही, निश्चल आहे. त्याने डोळे मिटलेले आहेत. चोच उघडत नाही. श्वासही घेत नाहीये. हे वर्णन करून पोपट मेलेला आहे हे जाहीर करण्याचं काम सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांवर सोपवलं आहे.

Sanjay Raut criticizes BJP : हिंमत असेल तर निवडणुका घ्या…राऊतांनी दिले थेट चॅलेंज

पोपटावर फडणवीसांची प्रतिक्रिया
फडणवीस म्हणाले, महाविकास आघाडीच्या वज्रमूठीला आधीच तडे गेलेले आहेत. कोणी कसे बसायचे, कुठे उभे राहायचे, कोणी बोलायचे यावरून वाद सुरू आहेत. उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांना पुरते कळले आहे की, आपला पोपट मेलेला आहे. मात्र, कार्यकर्त्यांना खूश करण्यासाठी पोपट जिवंत आहे हे दाखवावे लागते, अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती.

Sanjay Raut On Election Formula : महाविकास आघाडीच्या जागावाटपावर संजय राऊत स्पष्टच बोलले…

पोपट मेलाच आहे…
सत्तासंघर्षाच्या निर्णयावर बोलताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले, पोपट मेलाच आहे, फक्त ते विधानसभा अध्यक्षांनी जाहीर करायचे आहे. तसेच फडणवीसांना उत्तर देताना राऊत म्हणाले, हिंमत असेल तर तत्काळ महानगरपालिका निवडणुका घ्या. मग पोपट कोणाचा मेलाय आणि गर्जना कोणत्या वाघाची होते हे कळेल.

Tags

follow us