लोकसभेत ठाकरे गट 18 जागांवर लढणार?; राऊतांच्या दाव्याने काँग्रसची धडधड वाढली

लोकसभेत ठाकरे गट 18 जागांवर लढणार?; राऊतांच्या दाव्याने काँग्रसची धडधड वाढली

Sanjay Raut on seat allocation of Mahavikas Aghadi : आगामी लोकसभा निवडणुकांसाठी महाविकास आघाडीचा 16+16+16 असा फॉर्म्यूला ठरला आहे, आहे चर्चा सुरु असताना यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी महत्वाचे विधान केले आहे. आमच्यात असा कोणताही फॉर्म्यूला ठरलेला नाही. प्रसार माध्यमांकडूनच अशी वक्तव्य केली जात आहे. आमच्यात कोणत्याही प्रकारचे मतभेद नाहीत. आम्ही एकत्र राहूनच आगामी निवडणुका लढवणार आहे. तसेच अद्याप आगामी निवडणुकीसाठी जागावाटपाबाबत निर्णय झालेला नसल्याचे वक्तव्य ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केले आहे. दरम्यान ठाकरे गट 2024 च्या लोकसभा निवडणुकीत 19 जागा लढवणारच, असे मोठे विधान देखील यावेळी राऊत यांनी केले आहे.

खासदार संजय राऊत (Sanjay Raut) हे सध्या नांदेड दौऱ्यावर आहेत. तर ते उद्या बीड दौऱ्यावर देखील जाणार आहेत. दरम्यान नांदेडमध्ये पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना खासदार संजय राऊत यांनी जागावाटपाच्या प्रश्नावर महत्वाचे उत्तर दिले आहे. यावे बोलताना राऊत म्हणाले, महाविकास आघाडीच्या बैठकीत 16+16+16 चा फॉर्म्युला ठरलाय अशा बातम्या मला माध्यमांच्या द्वारे कळात आहे. मात्र आमचा अजून असा काही फॉर्म्युला ठरलेला नाही. तसेच महाविकास आघाडीत मतभेद नाही. आम्ही निवडणुका या एकत्र लढवणार आहोत . आम्ही या घटनाबाह्य सरकारला घालवू. आमचे 19 खासदार होते आणि राहतील. जिंकलेल्या जागा या जिंकलेल्या असतात त्या बदलू शकत नाही. आमचा आकडा कायम आहे, असे स्पष्ट मत खासदार राऊत यांनी व्यक्त केले आहे.

विधानसभा अध्यक्षांविषयी आदर…मात्र पदावर बसलेला…
आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांच्या कोर्टात आहे. यावर निर्णय अद्याप प्रलंबित आहे. यावर बोलताना संजय राऊत म्हणाले, विधानसभा अध्यक्षांविषयी आदर आहे. ते घटनात्मक पदावरील व्यक्ती. जसा आदर राज्यपालांविषयी होता तसा आदर विधानसभा अध्यक्षांविषयी आहे. विधानसभा अध्यक्षांकडून आम्हाला कायदेशीर निर्णयाची अपेक्षा आहे. तसेच फडणवीस म्हणत असतील पोपट मेलाय तर आगामी काळात पोपट कोणाचा मेलाय आणि गर्जना कोणत्या वाघाची होते हे कळेल. कृषी उत्पन्न बाजार समितीत जे दिसले ते झलक आहे ताबडतोब मनपा निवडणुका घ्या मग पोपट कोणाचा उडतो हे कळेल.

Sanjay Raut criticizes BJP : हिंमत असेल तर निवडणुका घ्या…राऊतांनी दिले थेट चॅलेंज

तो सरपंच होण्याच्या लायकीचा नाही…
16 अपात्र आमदारांमध्ये नांदेडचे आमदार बालाजी कल्याणकर आहे. यांच्याविषयी बोलताना राऊत म्हणाले, कल्याणकर हे गृहस्थ सरपंच होण्याच्या देखील लायकीचे नाही आहे. ते शिवसेनेच्या तिकिटावर आमदार झाले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत ते दिसणार नाही. मात्र जनता गद्यराना क्षमा करत नाही. त्यामुळे आगामी निवडणुकीत संबंधित ठिकाणी आमचाच उमेदवार निवडून येणार असल्याचे राऊत यांनी म्हंटले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube