छत्रपती संभाजीनगर: आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी विविध प्रश्नावर युवा संघर्ष यात्रा काढली होती. परंतु राज्यात मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) प्रश्न पेटला होता. राजकीय नेत्यांना गावबंदीचा निर्णय गावागावांमध्ये घेण्यात आला होता. त्यामुळे रोहित पवार यांनी आपली यात्रा स्थगित केली होती. आता यात्रा पुन्हा सुरू करणार असल्याचे रोहित पवार यांनी स्पष्ट केले आहे. दिवाळीनंतर जामखेड तालुक्यांतील चौंडी गावातून यात्रा सुरू करण्यात येणार असल्याचे रोहित पवारांनी सांगितले.
‘ओबीसी आरक्षण घटनाबाह्य’ हायकोर्टात याचिका, सरकारला अखेरची संधी
ही यात्रा नागपूरला 11 व 12 डिसेंबरला नागपूरमध्ये असणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा 12 डिसेंबरला आहे. या तारखेला योगही रोहित पवार यांनी जुळवून आणला आहे. पुण्यातून शरद पवार यांच्या उपस्थितीत ही यात्रा काढण्यात आली होती. यात्रेत दर दिवसाला 16 ते 19 किलोमीटर प्रवास केला जात होता. आता लवकर प्रवास पूर्ण करण्यासाठी दिवसाला 23-25 किलोमीटर प्रवास करणार आहे. ज्या तालुक्यात यात्रा जाईल, तेथील युवक जोडले जातील, असे रोहित पवारांनी स्पष्ट केले.
‘आरक्षणाचा GR घेऊन या, भेटच काय गळ्यातच पडतो’; फडणवीसांबद्दल मनोज जरांगेंचं वक्तव्य
शासकीय पदभरती आणि रोजगार उद्योग नोकरी, कृषी, आत्महत्या ,खताच्या किंमती, शिक्षण व कौशल्य विकास,कायदा व सुव्यवस्था व आरोग्य,सामाजिक व क्रीडा, मराठा आरक्षण, धनगर, लिंगायत, मुस्लिम समाजाचे आरक्षण प्रश्न असे 35 मुद्दे यात्रेत घेण्यात आले आहेत. दिलेला शब्द पळावा लागतो म्हणून यात्रा पुन्हा सुरू केली असल्याची माहिती रोहित पवारांनी सांगितले आहे.
राज्यात कमी पाऊस झाला आहे. फक्त ४० तालुके दुष्काळग्रस्त जाहीर केले. त्यामुळे सरकारने दुष्काळी परिस्थिती जाहीर केली पाहिजे. मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करून दुष्काळी उपाययोजना कराव्यात, याबाबत आम्ही विभागीय आयुक्तांना भेटलो असल्याचे रोहित पवारांनी म्हटले आहे.