Download App

आदित्य ठाकरेंना शेतीतलं काही कळत नाही, त्यांचा दौरा केवळ राजकीय स्टंट…; संजय शिरसाटांचे टीकास्त्र

आदित्य ठाकरे यांचा कालचा दौरा हा निव्वळ राजकीय स्टंट होता. ज्यांना शेतात कोणतं पीक आहे, हे कळत नाही. असे लोक आज बांधावर जात आहेत

  • Written By: Last Updated:

Sanjay Shirsat : ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी मराठवाड्यात (Marathwada) झालेल्या अतिवृष्टीबाबत पाहणी दौरा केला. यावरून शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी आदित्य ठाकरेंवर जोरदार टीका केली. आदित्य ठाकरेंना शेतीतलं काही कळत नसून त्यांचा हा दौरा केवळ राजकीय स्टंट होता, अशी टीका शिरसाट यांनी केली.

ठाकरेंचं दबावतंत्र, मविआत संघर्ष अटळ? ठाकरेंनी 22 संभाव्य उमेदवार हेरले 

संजय शिरसाट यांनी आज माध्यमाशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं. ते म्हणाले की, गेल्या आठ दिवसांपासून मराठवाड्यात पाऊस कोसळत आहेत, त्यामुळं अनेक धरण भरली. अनेक शेतांत पाणी गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालं आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी तातडीने पावलं उचलली आहेत. सर्व विरोधी पक्षांनी देखील शेतकऱ्यांच्या बांधावर जायला पाहिजे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळेल. मात्र स्टंटबाजी करू नका, असं शिरसाट म्हणाले.

Rockstar डीएसपीने भारत दौऱ्यापूर्वी चाहत्यांना केले खुश, संगीतकाराने थेट व्हिडिओ केला शेअर 

पुढं बोलतांना सिरसाट म्हणाले, आदित्य ठाकरे यांचा कालचा दौरा हा निव्वळ राजकीय स्टंट होता. ज्यांना शेतात कोणतं पीक आहे, हे कळत नाही. असे लोक आज बांधावर जात आहेत. आदित्य ठाकरेंना शेतातलं काही कळत नाही. केवळ दोन-तीन शेतात जाणं, शेतकऱ्यांशी हातमिऴवणी करून आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी आहोत, हे दाखवण्याचा हा प्रयत्न आहे, अशी टीका शिरसाट यांनी केली. मात्र शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून सरकार त्यांच्या पाठीशी असल्याचा दावा शिरसाट यांनी केला आहे.

ठाकरे यांच्या गाडीत सरडा घुसल्याच्या घटनेवर टोला लगावतानाच एक सरडा बाजूला आहे, त्याला आधी काढा, असा टोला शिरसाट यांनी संजय राऊत यांचे नाव न घेता लगावला.

इम्तियाज जलील यांनी महंत रामगिरी महाराज आणि आमदार नितेश राणे यांच्यावर कारवाई करण्यासाठी सरकारला 15 दिवसांचा अल्टिमेटम दिला. याविषयी विचारलं असता शिरसाट म्हणाले की, रामगिरी महाराज आणि नितेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल झाले आहेत. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होईलच. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केवळ हिंदूच नव्हे, तर सर्व धर्मातील धर्मगुरू आणि संतांचीही काळजी घेतली जाईल, असे सांगितल्याचं शिरसाट म्हणाले.

follow us