Download App

मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नाही तर आमदार नाराज होतील, संजय शिरसाटांचं मोठं विधान

शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी मोठं वक्तव्य केलं. मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नाही तर आमदार नाराज होतील, असं वक्तव्य शिरसाट यांनी केलं.

  • Written By: Last Updated:

Sanjay Shirsat : लोकसभा निवडणूका झाल्यानंतर राज्य मंत्रिमंडळ विस्तार (Cabinet expansion) होणार अशी चर्चा होती. आता निवडणुका संपल्या, पावसाळी अधिवेशनही संपलं. मात्र, अद्याप मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. अशातच आता मंत्रिमंडळ विस्ताराबाबत शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी मोठं वक्तव्य केलं. मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नाही तर आमदार नाराज होतील, असं वक्तव्य संजय शिरसाट यांनी केलं.

Urvashi Rautela Video: अभिनेत्रीचा ‘तो’ व्हिडिओ लिक; ऐन पावसाळ्यात चाहत्यांना फुटला घाम 

संजय शिरसाट यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलतांना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत विचारले असता शिरसाट म्हणाले की, मंत्रिमंडळाचा विस्तार झाला पाहिजे, नाहीतर अनेक आमदार नाराज होतील. मंत्रिमंडळ बनवायला काय हकरत आहे? असा सवाल त्यांनी केला. राज्यात लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होईल, असंही ते म्हणाले.

नशीब म्हणतात ते यालाच! फडणवीस हेलिकॉप्टर अपघातातून ‘सातव्यांदा’ बचावले; सर्व प्रसंग थरारक 

राज्यात जवळपास दोन वर्षांपासून मंत्रिमंडळ विस्तार रखडला आहे. त्यासाठी शिंदेंच्या सेनेचे अनेक नेते गुडघ्याला बाशिंग बांधून बसले होते. मात्र, त्यांच्या स्वप्नांवर पाणी फेरल्याचं दिसतं. शिरसाट यांच्या वक्तव्यानंतर आता विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत बोलतांना सरकारवर टीका केली. ते म्हणाले, विस्तार करणार तरी कसा? कोणा कोणाला नाराज करणार? एक अनार सौ बिमार, अशी परस्थिती आहे. या तिन्ही पक्षांनी आपल्या सर्वच आमदारांना मंत्रीपदाचे आश्वासन देऊन ठेवलं,असं वडेट्टीवार म्हणाले.

एकीकडे राज्यात मंत्रिमंडळ विस्तार होणार नसल्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, राज्यात लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे, काळजी करू नका. त्यामुळं तीन महिन्यांसाठी मंत्रीपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार, याकडे सर्वाचं लक्ष लागलं.

follow us