Urvashi Rautela Video: अभिनेत्रीचा ‘तो’ व्हिडिओ लिक; ऐन पावसाळ्यात चाहत्यांना फुटला घाम

Urvashi Rautela Video: अभिनेत्रीचा ‘तो’ व्हिडिओ लिक; ऐन पावसाळ्यात चाहत्यांना फुटला घाम

Urvashi Rautela Bathroom Video Leaked: बॉलिवूडमधून (Bollywood) एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. अभिनेत्री उर्वशी रौतेलाचा (Urvashi Rautela) खाजगी बाथरूमचा व्हिडिओ (Bathroom Video) लीक झाला आहे. उर्वशीचा हा लीक झालेला व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या (social media) प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर चाहते त्यावर मोठ्या प्रमाणात कमेंट करत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)


मात्र, लीक झालेला व्हिडिओ व्हायरल होताच या व्हिडिओबाबत सत्यही समोर आले आहे. चला तर जाणून घेऊया उर्वशीच्या या व्हिडिओचे पाठमागचे सत्य काय? व्हायरल होत असलेल्या उर्वशी रौतेलाच्या बाथरूम व्हिडीओचे सत्य हे खरे नसून चित्रपटातील दृश्य आहे. जर तुम्ही हा व्हिडिओ काळजीपूर्वक पाहिला तर तुम्हाला उर्वशीच्या गळ्यात मंगळसूत्र दिसत आहे. उर्वशीचे अजून लग्न झालेले नाही, मग ती मंगळसूत्र का घालेल.

लीक झालेला व्हिडिओ पाहताना कमेंटमध्ये लिहिले आहे की, – आराम करा, हे एका चित्रपटातील दृश्य आहे. तर दुसऱ्याने लिहिले, हे एखाद्या चित्रपटाचे प्रमोशन आहे असे दिसते. तर आणखी एकाने सांगितले, व्हिडीओ बारकाईने पाहिल्यास तिने मंगळसूत्र घातले आहे, हे नक्कीच एखाद्या चित्रपटातील दृश्य आहे. अशा कॉमेंट्स सध्या त्या व्हिडिओला मिळत आहेत.

Urvashi Rautela : उर्वशी रौतेलाचा कान्स फेस्टिव्हलमधला लूक

उर्वशी रौतेलाच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती सध्या बालकृष्ण नंदामुरी यांच्या ‘एनबीके 109’ या चित्रपटाचे शूटिंग करत आहे. मिळालेल्या माहितीनुसार शूटिंग सेटवर ती जखमी झाली आणि तिला घाईघाईने हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. ‘एनबीके 109’ व्यतिरिक्त उर्वशी बॉबी देओल, दुल्कर सलमान आणि आफताब शिवदासानी यांच्यासोबत कसूर या चित्रपटात काम करत आहे. ती जस्सी गिलसोबत एक चित्रपट करत आहे. उर्वशी सनी देओल आणि संजय दत्तसह हॉलिवूड ब्लॉकबस्टर एक्सपेंडेबल्स आणि बापचा देखील एक भाग आहे. ती रणदीप हुड्डासोबत इन्स्पेक्टर ‘अविनाश 2’ या वेबसिरीजमध्येही दिसणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube