Download App

‘काँग्रेसची अवस्था पाहून मनाला वेदना’; चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर सत्यजित तांबेंची पोस्ट

Image Credit: Letsupp

Satyajeet Tambe News : सध्या काँग्रेस पक्षाची स्थिती, अवस्था पाहून मनाला खूप वेदना होत असल्याचं म्हणत आमदार सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) भावूक झाले आहेत. राज्यात दोनवेळा मुख्यमंत्री राहिलेले अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी आपला काँग्रेसच्या विधानसभा सदस्यत्वचा राजीनामा दिला आहे. चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर राज्यातील काँग्रेसमध्ये मोठा भूकंपच झाला असल्याचं पाहायला मिळत आहे. काँग्रेसला रामराम करत अशोक चव्हाण भाजपात जाणार असल्याची चर्चा सुरु आहे. त्यावरुन महाविकास आघाडीच्या नेत्यांमधून टीकेचा सुर उमटल्यानंतर आता आमदार सत्यजित तांबे यांनीही एक्सवर पोस्ट शेअर केली आहे.

आमदार तांबे एक्सवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हणाले, “महाराष्ट्रातील कॉंग्रेस पक्षाची स्थिती पाहून मनाला खूप वेदना होत आहेत. ज्या संघटनेसाठी मी आयुष्याचे २२ वर्ष तन, मन, धनाने दिले त्याची ही हालत पाहून अस्वस्थ झालोय. खूप काही बोलायचे आहे, पण बोलणार नाही!” असं सत्यजित तांबे पोस्टमध्ये म्हणाले आहेत.

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे सोपविला आहे. तसेच त्यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेऊन चर्चाही केली. या दोघात झालेल्या चर्चेची माहिती अद्याप स्पष्ट झाली नाही. मात्र, या सगळ्या घडामोडी पाहता अशोक चव्हाण भाजपामध्ये प्रवेश करण्याची शक्यता असल्याचे सांगितले जात आहे.

चव्हाण पत्रात म्हटले, महोदय, मी दिनांक १२/०२/२०२४ मध्यान्हानंतर पासून माझ्या इंडियन नॅशनल काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा याव्दारे सादर करीत आहे. धन्यवाद.. आपला विश्वासू, असे तपशीलमध्ये लिहल्याचे दिसत आहे. अशोक चव्हाण यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे सोपविला आहे. तसेच त्यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेऊन चर्चाही केली. या दोघांमध्य झालेल्या चर्चेचा तपशील अद्याप उघड झालेला नाही. परंतु, या सगळ्या घडामोडी पाहता अशोक चव्हाण भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आले आहे.

दरम्यान, काँग्रेसचे काही नेते आमच्या संपर्कात असून ते आमच्याबरोबर येण्यास तयार असल्याचे भाजपचे नेते सांगतात. काँग्रेसचे नेते व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हेही संपर्कात असल्याचे अनेकदा भाजप नेत्यांकडून सांगितले. अशोक चव्हाण हे भाजपमधील येतील, असा दावा नांदेडचे भाजपचे खासदार प्रतापराव चिखलीकर यांनी दोन दिवसांपूर्वी केला होता. अशोक चव्हाण यांनी चिखलीकरांचा दावा खोडून काढला होता. आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोलापूर दौऱ्यावर अशोक चव्हाण यांच्याबाबत थेट भूमिकाच जाहीर करून टाकली आहे.

follow us

वेब स्टोरीज