Download App

शिंदे गटातील आमदारांची घरवापसी; एकनाथ खडसेंचा गौप्यस्फोट

Eknath Khadse On Maharashtra politics : राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन होऊन आता आठ ते नऊ महिने झाले आहेत. मात्र अद्यापही मंत्रीमंडळाचा विस्तार (Cabinet expansion) झालेला नाही. त्यामुळे शिंदे गटाच्या आमदारांमध्ये नाराजी असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. जशा जशा निवणुका जवळ येतील, न्यायालयाचा निकाल लागेल, तसे तसे उंदरासारखे एक एक आमदार शिंदे गटातून बाहेर पडतील, असा दावा त्यांनी केला आहे.

एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांना सोबत घेऊन शिवसेनेत बंडखोरी केली होती. यामुळे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरुन पायउतार व्हावे लागले होते. निवडणुक आयोगाने शिंदेंना शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह दिले आहे. पण ठाकरेंसोबत कार्यकर्ते आणि जनता असल्याचा दावा महाविकास आघाडीकडून केला जात आहे.

कर्नाटकच्या निवडणुकीत ‘शकुनी’ची एन्ट्री ! माजी मुख्यमंत्र्याच्या घरातच सुरू झाले महाभारत

एकनाथ खडसे पुढं म्हणाले, मंत्रिमंडळाचा विस्तार होत नसल्याने शिंदे गटातील अनेक आमदारांमध्ये अस्वस्थता आहे. शिंदे गटात गेलेले अनेक आमदारांमध्ये प्रचंड नाराजी असून ते खासगीमध्ये आपली खद्खद् बोलून दाखवली आहेत. आमदार बच्चू कडू यांनी तर 2024 च्या निवडणकीनंतरच मंत्री मंडळाचा विस्तार होणार असल्याचे बोलून दाखवले असल्याचही यावेळी खडसे यांनी सांगितले.

बाबरी मशिद पाडली तेव्हा मी कार सेवक म्हणून सहभागी झालो होतो. पंधरा दिवसांच्या तुरुंगवासात पोलिसांकडून मारहाण झाली असल्याचे खडसेंनी सांगितले. त्यावेळी आंदोलनात शिवसेनेचा अल्प सहभाग होता तरीही बाळासाहेब ठाकरेंनी ठाम भूमिका घेतली होती. सध्याच्या मंत्रिमंडळापैकी फक्त देवेंद्र फडणवीस या आंदोलनात सहभागी होते, असे खडसे यांनी सांगितले.

Tags

follow us