Download App

राज ठाकरे नुसता वारसहक्क दाखवत फिरत नाहीत; मनसे नेत्याचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला

  • Written By: Last Updated:

Avinash Jadhav on Uddhav Thackeray :  राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी नुकतीच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांची दिल्लीत भेट घेतली. या भेटीनंतर मनसे एनडीत सहभागी होणार, त्यांना महायुतीच्या माध्यमातून दोन जागा सोडल्या जातील, अशी चर्चा आहे. याच भेटीवरून ठाकरे गटाचे नेते उध्दव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) राज ठाकरेंवर जोरदार टीका केली. उद्धव ठाकरेंच्या टीकेचा आता मनसेचे अविनाश जाधव (Avinash Jadhav) यांनी चांगलाच समाचार घेतला. राज ठाकरे नसुता वारसाहक्क दाखवत फिरत नाही, असा टोला त्यांनी लगावला.

अजितदादा मित्र मंडळ SC चा निर्णय बदलणार का? ‘चिन्हा’च्या वापरावर रोहित पवारांचा सवाल 

उद्धव ठाकरेंच्या टीकेनंतर अविनाश जाधव यांनी एक्सवर एक पोस्ट लिहिली. त्यात त्यांनी लिहिलं की, राजसाहेब दिल्लीत गेले काय आणि इकडे अनेकांना पोटाचे आजार चालू झाले… संयम ठेवा थोडा.. राजसाहेब ठाकरे हे बाळासाहेबांच्या तालमीत राजकारण शिकलेले राजकारणी आहेत.. नुसता वारसहक्क दाखवत फिरत नाहीत, अशी टीका जाधव यांनी केली.

शेळपटासारखे लोटांगण घालता
मंगळवारी राज ठाकरे यांनी दिल्लीत जाऊन अमित शाह यांची भेट घेतली. अमित ठाकरे यावेळी उपस्थित होते. या भेटीत दोघांमध्ये राजकीय चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी आज एका जाहीर सभेत बोलतांना राज ठाकरेंवर तोफ डागली.

‘आम्हालाही आरेला कारे करता येतं पण..,’; शिवतारेंवरुन अजितदादा कडाडले

ते म्हणाले की, माझं मुख्यमंत्रीपद खेचलं म्हणून मी लढत नाही. महाराष्ट्र ओरबडला जातोय आणि कोणाला काहीच पडलेलं नाही. ना मिंधे ना काही पडलंय, ना अजित पवारांना काही पडलं आहे. आमचे सगेसोयरे, जरा या म्हटलं की, शेपूट हलवत जातात, अरे शरम वाटली पाहिजे, माझा महाराष्ट्र लुटला जातोय, आणि तुम्ही शेळपटासारखे त्यांच्या चरणी लोटांगण घालताय, अशी बोचरी टीका केली.

दरम्यान, आता अविनाश जाधव यांनी उद्धव ठाकरेंना राज ठाकरे नुसता वारसा हक्क सांगत नाहीत, असा टोला लगावला. त्यामुळं ठाकरे गट आणि मनसे आमने सामने येण्याची शक्तता आहे.

follow us