MNS Leader Sandeep Deshpande receives threat call : राज्यातील मराठी विरुद्ध अमराठी वादात राज ठाकरेंच्या (Raj Thackeray) मोठ्या नेत्याला फोनवरून धमकी मिळाली आहे. सध्या मराठी भाषेच्या वादावरून चांगलंच वातावरण तापलेलं आहे. मराठी विरुद्ध अमराठी वादाच्या पार्श्वभूमीवर मनसे (MNS) नेते आणि मुंबई शहर अध्यक्ष संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांना अज्ञात व्यक्तीकडून धमकीचा फोन आलाय. यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
राज ठाकरे हिंदू विरोधी आहेत. त्यांनी माफी मागावी. मनसेची पक्ष म्हणून मान्यता रद्द व्हावी, अशी मागणी उत्तर भारतीय विकास सेनेकडून करण्यात आलीय. तर भैय्या आमच्या पक्षाची मान्यता रद्द करा म्हणत (Maharashtra Politics) असतील, तर त्यांना मुंबईत राहू द्यायचे की नाही? याचा विचार आम्ही करू संदीप देशपांडे यांनी भूमिका जाहीर केली होती. सध्या सुरू असलेल्या या वादाच्या पार्श्वभूमीवर संदीप देशपांडे यांना अज्ञात व्यक्तीकडून धमकीचा फोन आल्याचं समोर आलंय.
संदीप देशपांडे यांनी या अज्ञात व्यक्तिविरोधात दादर पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. मंगळवारी रात्री सव्वा दहावाजेच्या सुमारास हा फोन आला होता. तर अशा धमक्यांना घाबरणार नाही, असं संदीप देशपांडे यांनी स्पष्ट केलंय. याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आलीय. पोलीस पुढील तपास करत आहे. हा व्यक्ती नेमका कोण? फोन करण्यामागे त्याचा नेमका उद्देश काय? यामागे आणखी कोणी आहे का? या सर्व प्रश्नांची उत्तरे अज्ञात व्यक्तीचा चेहरा समोर आल्यानंतरच मिळणार आहेत.
संदीप देशपांडे यांना एका अज्ञात व्यक्तीकडून धमकीचा फोन आला. त्याने शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप संदीप देशपांडे यांनी केला आहे. त्यांनी या प्रकरणी दादर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी एफआयआर नोंदवला आहे. आरोपीचा फोन नंबर ट्रेस करून शोध घेतला जात असल्याचं समोर आलंय.
‘कर्जत’मधील फोडाफोडी रोहित पवारांच्या जिव्हारी; म्हणाले, “आता तरी राम शिंदेंनी..”
मुंबईत हिंदी भाषिक लोकांना मारहाण केल्याच्या काही घटना घडल्या होत्या. हा विषय राजेश वर्मा यांनी थेट संसदेत देखील मांडला होता. मनसेची मान्यता रद्द व्हावी, अशी मागणी देखील हिंदी भाषिक नेत्याने केलीय. तर राज ठाकरे यांच्या कार्यकर्त्यांकडून हिंदी भाषिक लोकांवर अन्याय होत असल्याचा थेट आरोप केला जात आहे.