‘कर्जत’मधील फोडाफोडी रोहित पवारांच्या जिव्हारी; म्हणाले, “आता तरी राम शिंदेंनी..”

‘कर्जत’मधील फोडाफोडी रोहित पवारांच्या जिव्हारी; म्हणाले, “आता तरी राम शिंदेंनी..”

Rohit Pawar Criticized Ram Shinde : कर्जत-जामखेड विधानसभा निवडणुकीत रोहित पवार विरुद्ध राम शिंदे अशी लढत झाली. यात रोहित पवारांनी (Rohit Pawar) बाजी मारली होती. पराभवानंतर देखील शिंदे यांचे (Ram Shinde) पुनर्वसन करत भाजपने त्यांना विधानपरिषदेचे सभापती केले. सभापती हे संवैधानिक पद असून त्याचा अवमान राम शिंदे करत आहे. या पदांवरील आजवरच्या सर्वांनीच स्वतःला सक्रिय राजकारणापासून दूर ठेवत या पदांचा सन्मान वाढवला. पण, अलीकडच्या काळात या पदांवरील व्यक्तींनी राजकीय भूमिका घेऊन पदाचं अवमूल्यन करण्याचा विडा उचलला की काय अशी शंका येते, अशा शब्दांत आमदार रोहित पवार यांनी राम शिंदे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.

कर्जत जामखेड मतदारसंघात रोहित पवार विरुद्ध राम शिंदे यांच्यामध्ये राजकीय शीतयुद्ध सुरुच आहे. यातच कर्जत नगरपंचायतीमधील काही नगरसेवक राम शिंदे यांच्यासोबत भाजपात जाणार असल्याच्या चर्चा समोर आल्या आहेत. यामुळे रोहित पवार यांना मोठा धक्का बसला आहे. नगरसेवक यांनी मुंबईमध्ये जाऊन राम शिंदे यांची भेट घेतली. या फोडाफोडीच्या राजकारणावरून आता रोहित पवार आक्रमक झाले आहेत.

राम शिंदेंच्या गुगलीवर रोहित पवार क्लीन बोल्ड.. निवडणुकीतील पराभवाचा घेतला बदला

रोहित पवारांचा राम शिदेंना शाब्दिक टोला

राज्यपाल, विधानसभा अध्यक्ष आणि विधानपरिषदेचे सभापती ही घटनात्मक पदे आहेत. महाराष्ट्रात या पदांवरील व्यक्तींना विशेष मानसन्मान आहे. कारण या पदांवरील आजवरच्या सर्वांनीच स्वतःला सक्रिय राजकारणापासून दूर ठेवत या पदांचा मान सन्मान वाढवला. पण अलीकडच्या काळात या पदांवरील व्यक्तींनी राजकीय भूमिका घेऊन पदाचं अवमूल्यन करण्याचा विडा उचलला की काय, अशी शंका येते.

विधानपरिषदेच्या सभापती महोदयांनी तर विधिमंडळातील दालनात कर्जत नगरपंचायतीच्या काही नगरसेवकांसोबत पत्रकार परिषद घेऊन एका क्षणात विधिमंडळाच्या प्रथा, परंपरा आणि संकेतांना धुळीस मिळवलं. वास्तविक प्रथा परंपरा, निष्ठा, विचार यांची बरोबरी पैशात कधीही होऊ शकत नाही, त्यामुळं कर्जत~जामखेडने पैशांपेक्षा प्रथा, परंपरा, निष्ठा आणि विचार कायमच जपला. पण आज..????

एक मात्र बरं झालं, यानिमित्ताने फोडाफोडीमागे कुणाचा चेहरा आहे, हे उघड झालं. आता अपेक्षा एकच आहे, त्यांनी राजकारण जरूर करावं पण घटनात्मक पदावर राहून या पदाची प्रतिष्ठा मलीन होणार नाही याची आणि कर्जत जामखेडच्या प्रतिष्ठेला धक्का बसणार नाही, याची काळजी घ्यावी.

कर्जतमध्ये नेमकं काय घडलं?

आमदार रोहित पवार यांनी कर्जत नगरपंचायतीमध्ये एक हाती सत्ता मिळवत भाजप आमदार राम शिंदे यांच्या सत्तेला सुरुंग लावला होता. कर्जत नगरपंचायतीमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे 12 तर काँग्रेसचे तीन आणि भाजपला दोन जागा मिळाल्या होत्या. उषा राऊत यांची नगराध्यक्षपदी तर काँग्रेसच्या रोहिणी घुले या उपनगराध्यक्ष होत्या. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असल्याने जनतेच्या आशा पल्लवीत झाल्या.

मात्र एकाच कुटुंबाकडे पदे जात असल्याने नाराजीचा सुरू समोर येऊ लागला व रोहित पवार यांच्याविषयी संतापाची भावना समोर आली. यातच या सर्व नगरसेवकांनी नगरपालिकेच्या अध्यक्षांविरोधात अविश्वासाचा ठराव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला. यामुळे रोहित पवारांना राजकीय धक्का देत हे सर्व नगरसेवक भाजपमध्ये दाखल होणार असल्याची चर्चा आहे. एका अर्थी रोहित पवार यांना धक्का देत शिंदे यांनी विधानसभा निवडणुकींमधील पराभवाचा बदलाचं घेतल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube