Raj Thackeray On ED Action : राज्यात सध्या विरोधी पक्षाच्या नेत्यांवर ईडीच्या कारवाईचं सत्र सुरु आहे. भाजप केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करत असल्याचा सूर विरोधकांकडून नेहमीच उमटत असतो. अशातच आता ईडीच्या कारवायांवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनीही भाजपला थेट इशाराच दिला आहे. ईडी कारवाई भाजपला भविष्यात परवडणारी नसल्याचं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. ठाकरे सध्या नाशिक दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे.
मोठी बातमी: ‘लॉकअप’ फेम अभिनेत्री पूनम पांडेचं कॅन्सरने निधन, बॉलिवूड इंडस्ट्रीत पसरली शोककळा
राज ठाकरे म्हणाले, नाशिकमध्ये लोकसभा निवडणूकी संदर्भात चर्चा झाली आहे. यासंदर्भआत लवकरच आम्ही निर्णय घेणार आहे. प्रत्येक मतदारसंघात निवडणूक लढवली पाहिजे, अशी सर्वांची अपेक्षा आहे, मात्र लवकरच निर्णय घेऊ असं ठाकरे म्हणाले आहेत. ज्यांच्या हातात सत्ता आहे ते सगळे तयारी करत आहेत. सध्या ईडीच्या कारवायांचं सत्र सुरु आहे. ईडी कारवाई भविष्यात भाजपला परवडणारी नसल्याचं राज ठाकरे म्हणाले आहेत.
कायदा ढाब्यावर बसवून शिवसेना चोरांच्या हाती दिली; नार्वेकरांचं नाव घेत ठाकरेंची जळजळीत टीका
सगळे शांत झाले की, मी पण लवकरच अयोध्यामध्ये जाणार आहे. काळाराम मंदिरात मी दर्शनासाठी जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारखा पंतप्रधान व्हावा, असं मी म्हणालो होतो. आता मी चाचपणी करत आहे. राजकारण्यांना जोपर्यंत मतदार वटणीवर आणत नाहीत तोपर्यंत हे असेच सुरू राहणार असल्याचंही ठाकरेंनी स्पष्ट केलं आहे.
सत्ताधाऱ्यांची गटबाजी दिसत नाही विरोधकांची दिसते…
सर्वच पक्षांमध्ये गटबाजी असते. सत्ताधाऱ्यांची दिसत नाही आणि विरोधकांची दिसून येत असते. आत्ता लोकसभा निवडणुका आहोत, पण विधानसभा, महापालिका निवडणुका येऊ द्या मग तुम्हाला सत्ताधाऱ्यांची अंतर्गत गटबाजी दिसेल. आमचा उघडा कारभार आहे त्यामुळे आमची गटबाजी दिसते असल्याचं राज ठाकरे म्हणाले आहेत. तसते ठराविका लोकांच्या जीवावर निवडणुका लढवायच्या आणि अपयश पदरात पाडून घ्यायंच हे मान्य नाही मला त्यामुळे मी निवडणूक लढवत नाही. मी थोडासा विचार करणार असून सध्या मतदारसंघात चाचपणी करत असल्याचंही ते म्हणाले आहेत.