कायदा ढाब्यावर बसवून शिवसेना चोरांच्या हाती दिली; नार्वेकरांचं नाव घेत ठाकरेंची जळजळीत टीका
Udhav Thackeray On Rahul Narvekar : कायदा ढाब्यावर बसवून शिवसेना चोरांच्या हाती दिली असल्याची जळजळीत टीका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांवर केली आहे. अपात्र आमदार प्रकरणी राहुल नार्वेकरांनी निकाल दिला. त्यानंतर विरोधकांकडून सर्वोच्च न्यायालयाचा अपमान केला असल्याचा आरोप करण्यात आला. आता पुन्हा एकदा ठाकरेंनी या मुद्द्यावरुन नार्वेकरांना टार्गेट केलं आहे. ते रायगडमधील सभेत बोलत होते.
राज्यसभेचा सामना : ठाकरे-पवार महायुतीला ‘बाय’ देणार की ‘वचपा’ काढणार?
अपात्र आमदार प्रकरणाचा निकालामध्ये राहुल नार्वेकरांनी दोन्ही गटाचे आमदार पात्र ठरवले असून शिवसेना पक्ष हा शिंदे गटाचाच असल्याचा निकाल दिला आहे. त्यावरुन उद्धव ठाकरे नार्वेकरांवर चांगलेच कडाडल्याचे पाहायला मिळाले आहेत. ते म्हणाले, राहुल नार्वेकरांनी उफराटा न्याय दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने काय चौकट दिली आणि लबाडाने काय ढोंग केलं हे तुम्ही पाहिलं आहे. कायदा ढाब्यावर बसवून शिवसेना त्यांनी चोरांच्या हाती दिली असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.
प्रभासनंतर आता रणबीर साकारणार श्रीराम! सीतेच्या भूमिकेत प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री
तसेच हिंमत असेल तर इथे येऊन सांगा की शिवसेना कुणाची हे माझं खुलं आव्हानच उद्धव ठाकरे यांनी राहुल नार्वेकरांना दिलं आहे. शिवसेनेने अनेक पिढ्या घडवल्या आहेत. त्यातील एक पिढी गद्दार निघाली म्हणून शिवसेना गद्दारांची होऊ शकत नाही. भाजपला सांगायचं तुम्ही अंगावर येतायं तर या पण तुमच्याकडे सगळी भाडोत्री अन् गद्दारांची फौज असल्याचं उद्धव ठाकरे यांनी ठणकावूनच सांगितलं आहे.
दारु घोटाळा प्रकरण : दिल्लीचे CM अरविंद केजरीवालांना ईडीकडून पाचव्यांदा समन्स
गद्दारांची भाडोत्री फौज घेऊन तुम्ही निष्ठावंताचा सामना करु शकत नाही. माझ्याकडे मूठभरच आहेत पण निष्ठावान आहेत. शिवसेना पक्ष, धनुष्यबाण, माझे वडील चोरण्याचा प्रयत्न केला आहे, माझे वडिला का चोरता? तुम्हाला तुमच्या वडिलांचा अभिमान नसेल पण मला माझ्या वडीलांचा आहे, भाजप म्हणजे चोरबाजार असल्याचंही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.