Download App

Sujay Vikhe On Narendra Modi : देशात मोदींची हमी टिकणार : सुजय विखे

Sujay Vikhe On Narendra Modi : अहमदनगर दक्षिण लोकसभा निवडणुकीसाठी विद्यमान खासदार सुजय विखे जोरदार प्रचार करताना दिसत आहे

  • Written By: Last Updated:

Sujay Vikhe On Narendra Modi : अहमदनगर दक्षिण लोकसभा निवडणुकीसाठी (Ahmednagar Lok Sabha Election) विद्यमान खासदार सुजय विखे (Sujay Vikhe) जोरदार प्रचार करताना दिसत आहे. ते आज ते जामखेडमध्ये होते, यावेळी महायुतीच्या कॉर्नर मिटींगमध्ये बोलताना सुजय विखे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या तिसऱ्या पर्वाची दमदार वाटचाल सुरु असून त्यावर 4 जून रोजी शिक्कामोर्तब होणार आहे.

गेल्या 10 वर्षात लोकांच्या फायद्यासाठी विविध कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी मोदी सरकारने केली. त्यामुळे देशात मोदींची हमी टिकणार असं देखील यावेळी सुजय विखे म्हणाले. यावेळी आमदार राम शिंदे यांच्यासह विविध पदाधिकारी आणि अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी विखे म्हणाले की, गेल्या 10 वर्षात नरेंद्र मोदी यांनी देशात अनेक विकास कामे केली आहे. यामुळे विकसित देशाकडे आपल्या देशाची वाटचाल होत आहे. आज आत्मनिर्भर भारत योजनेच्या माध्यमातून उद्योगधंद्यांना नवीन दिशा देण्याचे काम मोदींच्या नेतृत्वाखाली होत आहे. कलम 370, तीन तलाक, राम मंदिर, समान नागरी कायदा हे मोदी सरकारचे वेगळेपण आहे.

गेल्या 10 वर्षात मोदींनी सर्वांना सारखाच न्याय देण्याचे काम केले आहे. यामुळे जनता आज त्यांच्यावर खुश असून त्यांना पुन्हा एकदा संधी देणार आहे. यामुळे मताची किंमत ओळखून मतदारांनी देशाची सुत्रे कुणाच्या हाती द्यायचे आहेत याचा विचार करून मतदान करा असं देखील यावेळी सुजय विखे म्हणाले.

भाजपने दावा सोडला, नाशिकच्या जागेबद्दल मुख्यमंत्री घेणार निर्णय; चंद्रशेखर बावनकुळे यांची मोठी घोषणा

तर सुजय विखेंना मत म्हणजे मोदींना मत यामुळे महायुतीचे उमेदवार सुजय विखे यांना प्रचंड मतांनी निवडून देण्याचे आवाहन आमदार राम शिंदे यांनी केला.

follow us

वेब स्टोरीज