माजी आमदारांनी दमडीचाही निधी खर्चला नाही; सुजय विखेंनी लंकेंना पुन्हा घेरले

माजी आमदारांनी दमडीचाही निधी खर्चला नाही; सुजय विखेंनी लंकेंना पुन्हा घेरले

Sujay Vikhe Criticized Nilesh Lanke : स्थानिक माजी आमदाराच्या नाकर्तेपणामुळे पारनेर तालुक्याचा विकास थांबला असून त्यांच्या नियोजनशून्य कारभारामुळे पारनेरचे कोणतेही प्रश्न सुटले नाहीत. तसेच पर्यटन विकासासाठी आमदाराने दमडीचाही निधी खर्च केला नाही. अशा धोरणहीन राजकारणामुळे पारनेर तालुका विकासापासुन वंचित राहिला, अशी घणाघाती टीका महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांनी निलेश लंके यांचा नामोल्लेख टाळत केली.

सुजय विखे आज पारनेर दौऱ्यावर होते. यावेळी विखेंनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला. लोकसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला असून महायुतीचे उमेदवार सुजय विखे यांनी आपल्या मतदारांच्या गाठीभेटी वाढविल्या आहेत. रविवारी पारनेरमधील कान्हुरपठार भागात बूथ कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी त्यांच्यासह भाजपचे विश्वनाथ कोरडे, माजी जिल्हा परिषद सदस्य काशिनाथ दाते, तालुकाध्यक्ष राहुल शिंदे, दिनेश बाबर, गोकुळ काकडे, सागर व्यवहारे तसेच इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Nilesh Lanke : सभेचे नियोजन फिस्कटले लंके परतले, ‘जनसंवाद नव्हे तर ही फसवणूक यात्रा’ भाजपचा हल्लाबोल

यावेळी खासदार विखे यांनी विरोधकांना चांगलेच फैलावर घेतले. त्यांनी सांगितले की, पारनेर तालुक्यातील बहुतांश भागात शेती केली जाते. या भागात शेतकऱ्यांना पाण्याचा मोठा प्रश्न भेडसावत असताना स्थानिक माजी आमदारांनी त्यासाठी कोणतेही प्रयत्न केले नाहीत. या परिसारात अनेक प्रसिद्ध धार्मिक स्थळे आहेत त्यातून पर्यटन विकास साधता आला असता. त्यातून स्थानिकांना रोजगार मिळाला असता, पण स्थानिक माजी आमदारांनी या दृष्टीने कधीही विचार केला नाही.

कारण त्यांच्याकडे विकासाचे कोणतेही धोरण नाही. पर्यटन विकासासाठी आमदाराने दमडीचाही निधी खर्च केला नाही. त्यामुळे संधी असतानाही पारनेर तालुका पर्यटन विकासापासून वंचित राहिला. पण आता असे होणार नाही. येणाऱ्या काळात केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यनातून पर्यटनाचा विकास केला जाईल असे त्यांनी आश्वासन दिले.

Sujay Vikhe : ‘कोल्हेंच्या आमंत्रणाला मी किंमत देत नाही’ खासदार विखेंचा खोचक टोला

या परिसरात मेंढपाळ बांधवांची संख्या मोठी आहे. त्यांच्यासाठी माजी आमदार नेहमीच उदासीन राहीले आहेत. या बांधवांसाठी लोकर प्रक्रिया केंद्रासाठी निर्णय झाला आहे. त्याची कार्यवाही लवकरच सुरू होईल. हा प्रकल्प पारनेर तालुक्याच्या विकासासाठी मोठी संजिवनी ठरणार असून मेंढपाळ बांधवांचा विकास साधला जाणार असे त्यांनी सांगितले.

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube