Mohit Kamboj : राऊतांच्या ‘त्या’ आरोपांनंतर आज कंबोज पत्रकार परिषद घेणार

Mohit Kamboj On Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस यांचे जवळचे मोहित कंबोज रात्री ३ वाजता बारमध्ये मुलींना घेऊन नाचत आहेत, पोलीस त्यांच्यावर कारवाई करत नाहीत. असा दावा संजय राऊत यांनी संभाजी ब्रिगेड संघटनाप्रमुख सचिन कांबळे यांचा एक व्हिडीओ ट्वीट करून केला होता. त्यामुळे राऊत यांनी थेट देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला होता. यावर आता भाजप […]

Raut Kamboj

Raut Kamboj

Mohit Kamboj On Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस यांचे जवळचे मोहित कंबोज रात्री ३ वाजता बारमध्ये मुलींना घेऊन नाचत आहेत, पोलीस त्यांच्यावर कारवाई करत नाहीत. असा दावा संजय राऊत यांनी संभाजी ब्रिगेड संघटनाप्रमुख सचिन कांबळे यांचा एक व्हिडीओ ट्वीट करून केला होता. त्यामुळे राऊत यांनी थेट देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला होता.

यावर आता भाजप नेते मोहीत कंबोज राऊतांच्या आणि अतुल लोंढे यांनी केलेल्या आरोपांनंतर आज पत्रकार परिषद घेणार आहेत. संजय राऊत अतुल लोंढे यांनी मोहित कंबोज यांच्यावर पोलिसांशी एका हॉटेलमध्ये वाद घातल्याचा आरोप केला होता. सकाळी 11 वाजता ही पत्रकार परिषद होणार आहे.

“मोहित कंबोज पहाटे 3.30 ला मुलींसोबत…” व्हिडीओ शेअर करत राऊत आक्रमक; फडणवीसांना म्हणाले…

संजय राऊत अतुल लोंढे यांनी केलेले आरोप मोहित कंबोज यांनी फेटाळून लावले आहेत. या आरोपांमागे कोण आहे? त्यामागील सत्य काय आहे हे सांगण्याचा प्रयत्न ते करणार आहेत. त्यामुळे ते यावर काय स्पष्टीकरण देताता हे पाहण महत्तवाचं ठरणार आहे.

संजय राऊत यांनी शेअर केलेल्य व्हिडीओमध्ये सचिन कांबळे मोहित कंबोज यांच्याबाबत दावा करत आहेत. ‘लिंक रोड खार पश्चिम येथील रेडिओ बार येथे देवेंद्र फडणवीस यांचे खास मोहित कंबोज मुलींना घेऊन नाचत आहेत, धिंगाणा घालत आहेत. बेधुंद अवस्थेत, नशा करून ते मुलींसोबत नाचत आहेत’ असा दावा कांबळे यांनी या व्हिडीओमध्ये केला आहे.

तसेच याच व्हिडिओमध्ये ते पुढे असं म्हणतात की, ‘आमच्या सभा साडेदहा वाजताच बंद करता आणि मग यांना साडेतीन वाजेपर्यंत मुलीसोबत कसे नाचू शकतात’, असा थेट सवालही कांबळे यावेळी विचारत आहेत.

Exit mobile version