बारामती: उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे स्वच्छतेच्याबाबतीत आणि वेळेच्याबाबतीत काटेकोर असतात. हे आपण अनेकदा बघितले आहे. यावरून त्यांनी अनेकदा सरकारी अधिकाऱ्यांनाही झापले आहे. परंतु एका कार्यालयातील अस्वच्छतेवरून अजित पवार यांना त्यांच्या आईनेच चिमटा काढला आहे. बारामतीतील (Baramati) एका कार्यक्रमात स्वच्छतेवर बोलताना अजित पवारांनी हा किस्सा सांगितला आहे.
Sharad Mohol हत्येप्रकरणी आणखी तिघे ताब्यात; मारण्यासाठी गोळीबाराचा सराव केल्याचं समोर
अजित पवार म्हणाले, बारामतीत अनेक सुविधा देतो. परंतु स्वच्छतेच्या बाबतीत बारामती शहर हे देशात अठराव्या क्रमांकावर आहे. देशात बारामतीचा पहिला क्रमांक आला पाहिजे. माझ्याप्रमाणे तुम्ही पण वागा, देशात आपला पहिला नंबर येईल. काही तरी घाण करतात. पचकन कुठेही थुंकताल हे थांबवा, अशा कानपिचक्या पवारांनी दिल्या. त्यानंतर स्वच्छतेवरून आईने सुनावल्याचे एक किस्सा अजितदादांनी सांगितला आहे.
आईच्या नावावर एक प्लॉट आहे. त्याच्या शेजारी ५८ गुंठे जमिन शेजारी विकायला होती. आईच्या नावावर घ्यायची होती. या जमिनीचे रजिस्ट्रेशन करण्यासाठी ती कोर्टात गेली होती. तेथील स्वच्छतेची परिस्थिती बघून तिने मलाच सुनावले. अरे तू बारामतीचा आमदार आहे. तुझे कौतुक सारे करतात. जरा कोर्टात जाऊन बघ. जरा स्वच्छता कर तिथे, असे आई मला म्हणाला, असा किस्सा अजित पवारांनी सांगितला.
वकील सर्व ठिकाणी लक्ष देतात पण…
मागे एकदा मी ही तेथे गेले होतो. परंतु आम्ही बोललो न्यायव्यवस्थेला आवडत नाही. शेवटी मी त्या क्षेत्रातील एका मान्यवराला ही परिस्थिती सांगितली. तेथे सरकार सर्व रंगरंगोटी करायला तयार आहे. जर बारामतीला सर्वसामान्य नागरिकांना आत गेल्यानंतर स्वच्छ वाटत नसेल तर बारामतीसाठी हे कमी पणाचे आहे, असे अजित पवार म्हणाले. तेथील वकील सर्व ठिकाणी लक्ष देतात. परंतु न्यायालयात लक्ष देत नाही, अशा कानपिचक्या अजित पवारांनी दिल्या आहेत.
माझ्या इतके काम कुणी करत नाही.
माझे चँलेज आहे. मी आमदार म्हणून जेवढे काम करतो. तेवढे कोणताच आमदार करू शकत नाही. मी सहा- पाच वाजता उठतो. एेवढे काम करतो. बारामतीच्या विकासाठी आणखी प्लॉन केले पाहिजे. सुविधा आपण आणखी वाढवू. पण चुकीचे वागू नये, असेही अजितदादा म्हणाले.